testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

झाडांनादेखील आवडते संगीत

संगीतचा आणि झाडांचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण झाडांनी गाणे ऐकल्यावर त्यांच्यावर परिणाम होतो अशी माहिती एका रिसर्चमध्ये समोर आली आहे. संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, म्युझिकमुळे झाडांची वाढ अधिक वेगाने होते. त्याचप्रमाणे असे देखील सांगण्यात आले आहे की जर कुणी व्यक्ती झाडांना स्वत: गाणं गाऊन ऐकवत असेल तर त्या झाडांची वाढ झपाट्याने होते. यामुळे झाडांना जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइड मिळते. झाडाचे म्युझिकसोबत असलेले हे नाते अतिशय खास आहे.
अन्नामलाई विश्वविद्यालयातील वनस्पती विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. टी सी सिंह यांनी सांगितले की बी परेल्यानंतर जर त्यांना गाणे ऐकवण्यात आले तर त्यांच्यात झपाट्याने वाढ झाली. एवढेच नाही तर इतर रोपट्यापेक्षा या रोपट्यांमध्ये अधिक पाने असल्याचे देखील निदर्शनास आले. तसेच या पानांचा आकारदेखील इतर पानांपेक्षा मोठा आणि जाड असतो. त्यामुळे यातून हाच निष्कर्ष समोर आला आहे की झाडांच्या वाढीसाठी गाण्याची मोठी मदत होते.
सिंह यांच्या म्हणण्यानुसार गाण्यामुळे त्यांच्या आनुवंशिक गुणसूत्रांमध्येदेखील बदल होतो. कॅनडातील एका इंजिनिअरने गहूच्या रोपट्यांवर एक प्रयोग केला.


यावर अधिक वाचा :