शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2017 (16:06 IST)

डुडल: पहिल्या महिला फोटोग्राफर व्यारावाला यांना आदरांजली

भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकार होमाई व्यारावाला यांना त्यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त गुगलने आज डुडलद्वारे आदरांजली वाहिली. होमाई व्यारावाल यांनी स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटना घडमोडींची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती.

होमाई व्यारावाला यांचा जन्म 9 डिसेंबर 1913 रोजी गुजरातमधील नवसारी येथील एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. आपल्या मित्राकडून त्यांनी फोटोग्राफी शिकली. 1942 मध्ये दिल्लीत वास्तव्याला आल्यानंतर, त्यांनी पत्रकारितेसाठी फोटोग्राफीला सुरुवात केली.

स्वातंत्र्य लढ्याच्या अखेरच्या पर्वात पंडित नेहरु, महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची, तसेच, स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक महत्त्वाच्या घटना, त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या. 2012 मध्ये त्यांचं किरकोळ अपघातानंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झालं. त्यांना 2011 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कारनेही गौरवले होते.