सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: सोमवार, 9 डिसेंबर 2019 (11:56 IST)

आपल्या पर्सनॅलिटीला कोणती हँडबॅग सूट करेल जाणून घ्या

आपल्या पर्सनॅलिटी आणि लूकची काळजी सगळेच घेतात. तुम्ही कोणती हँडबॅग वापरता, काय विचार करून हँडबॅग घेता हे ही तितकेच हत्त्वाचे असते. तुमच्या पर्सनॅलिटीला कोणती हँडबॅग सूट होते हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. 
 
अनेक महिलांना समजत नाही की आपल्या पर्सनॅलिटीला कोणती बॅग सूट होईल. त्यामुळे अनेकदा महिला न सूट होणार्‍या बॅग खरेदी करतात आणि टीकेच्या धनी ठरतात. तुमच्याबाबतीत ही असे होऊ नये असे वाटत असेल तर हे जरूर वाचा. जर तुम्हीही हँडबॅग खरेदी करण्याचे शौकीन असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगतोय की तुच्या बॉडी शेपनुसार कोणत्या प्रकारची बॅग घ्यावी.
 
कमी उंचीच्या महिलांसाठी
जर तुमची उंची कमी आहे आणि तुम्ही मोठ्या साईजची बॅग वापरत असाल तर ती चांगली दिसणार नाही. तुम्ही लहान ते मीडियम आकाराच्या बॅग्स वापरू शकता. मात्र लक्षात ठेवा की बॅगेची स्ट्रिपची लांबी मीडियम असली पाहिजे. लांब स्ट्रिप असणार्‍या बॅगेमुळे तुमची कमी उंची दिसून येईल. 
 
उंच आणि बारीक महिलांसाठी
जर तुमची उंची योग्य आहे आणि तुम्ही थोड्या स्किनी आहात तर लांब बॅग घेऊ नका. रूंद, मोठ्याबॅगा तुम्हाला सूट करू शकतात.
 
कर्व्ही आणि प्लस साईज महिलांसाठी
जर तुमची साईज प्लस आहे तर लहान आकाराच्या बॅगेमुळे तुम्ही अधिक मोठ्या दिसाल. मीडियम  आकाराच्या बॅग तुमच्या बॉडीला चांगला लूक देईल.
 
पिअर शेपच्या महिलांसाठी
तुमच्या शरीराचा आकार पिअर फळाप्रमाणे असेल तर मोठ्या बॅग्स घेऊ नका. यामुळे तुमचे हिप्स आणि जांघा हाईलाईट होतील.
 
अ‍ॅपल शेपच्या महिलांसाठी
ज्या महिलांचा आकार वरच्या बाजूला रूंद असतो अशा महिलांना छोट्या आकाराच्या तसेच छोट्या स्ट्रिपवाल्या बॅग अजिबात सूट करणार नाहीत. तुम्ही रुंद बॅग्स नक्की ट्राय करू शकता.
 
बॅलन्स शेप महिलांसाठी
जर तुमची फिगर एकदम बॅलन्स असेल तर मीडियम आकाराच्या टोट्‌स अथवा क्रॉसबॉडी बॅग निवडा. या तुच्यावर छान सूट करतील.