बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (11:26 IST)

पहा २०१९ मधील डेनिम ट्रेंड

डेनिम हे तरुणांमधील सर्वात आवडते फॅब्रिक आहे. त्यामधील असलेले अनेक प्रकार आणि विविधता तरुणांना आकर्षित करण्याचे मुख्य कारण आहे. मागील वर्षांमध्ये यामध्ये काय कशाप्रकारे बदल झाले आणि यावर्षी २०१९ मध्ये कोणत्या प्रकारचे डेनिम ट्रेंड असतील याविषयी स्पायकर लाइफस्टाईलचे डिझाइनर हेड अभिषेक यादव यांनी माहिती सांगितली आहे.
 
१४० वर्षांमध्ये डेनिम हे कापड सगळ्यांच्या पसंतीस उतरताना दिसलं आहे. हे कापड जगातील सर्वात लोकप्रिय कापडांपैकी एक बनले आहे. तरुण डिझाइनर्समध्ये हे कापड पसंतीचे राहिले आहे, कट, वॉश आणि सफाईदारपणा डेनिम जॅकेट्स आणि जीन्सला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. ग्राहक यामधील विविधता सकारात्मकतेने स्वीकारतात.
 
फॅशनची जाण असलेल्या ग्राहकांना चांगली ओळख असलेले कपडे हवे असतात जे त्यांना स्वतःला व्यक्त करण्यास मदत करू शकतात. प्रयोग आणि नाविन्यता करीत राहण्याची वृत्ती हे के साधन आहे आणि ज्याची अत्यंत गरज असते. अत्याधिक सजावटीसाठी वैयक्तिक मेहनत कौतुकास्पद असते. आवडीच्या  ड्रेसिंगची मागणी करणाऱ्या तरुण ग्राहकांना पोशाखाद्वारे स्वत:ला अभिव्यक्त करू इच्छितात, जे त्यांना सगळ्यांमधून उठून दिसण्यास मदत करते.
वयाची संकल्पना दिवसेंदिवस बदलत चालली आहे; ३० वय हे नवीन २० वय झाले आहे आणि ४० वय नवीन ३० आहे. याच सोबत, तरुण केंद्रित फॅशन व्यापली आहे. 'प्रौढ' आणि 'तरुण' कपड्यांमध्ये एक अस्पष्ट रेष आहे. रस्त्यावर प्रेरित असलेले कलेक्शन आणि पोशाखांमधील फॅशन वाढत आहे. हे कपड्यांमध्ये कॅज्युअल आणि स्मार्ट यामध्ये फरक असल्याचे दर्शवते. फॅशनमध्ये भूतकाळ नेहमीच महत्वाची भूमिका बजावेल.
 
विंटेज डेनिम मध्ये पुन्हा स्वारस्याता येईल, ग्राहकांना डेनिमचा अस्सलपणा कसा ओळखावा हे ही माहिती झाले आहे. चालू फॅशन सोबत उच्च-गुणवत्तेला प्राधान्य दिले जाईल.
 
२०१९ मध्ये क्लासिक जीन्स मध्ये सुद्धा सुधारणा होईल. डेनिमच्या मूलभूत गोष्टी आणि वर्कवेअर कलात्मक पद्धतीने छान दिसतात. सखोल डिझाइनची संकल्पना, अत्याधुनिक डेनिम्स क्लासिक लुक ला आव्हान देतात. हँडमेड डुडल आर्ट आणि टायपोग्राफी यामध्ये काही तंत्र वापरली जातात. राजकारण, ग्राहकवाद आणि स्थिरता यांवर लक्ष केंद्रित करणारे लोगो आणि घोषणा प्रिंट केले जातात. डेनिम पॅच, पिन आणि स्ट्रॅप्ससह सुशोभित केले जातात, जे एम्ब्रोएडरी आणि प्रिंट फॉर्ममध्ये वैशिष्ट्यीकृत केले जातात.