गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

तब्बल 122 फूट लांबीचा डायनासोर!

न्यूयॉर्क- संशोधकांनी डायनासोरच्या एका नव्या आणि अतिभव्य अशा प्रजातीचा शोध लावला आहे. ही प्रजाती आतापर्यंतच्या सर्व ज्ञात डायनासोर प्रजातींमध्ये सर्वात मोठ्या आकाराची आहे. हे डायनासोर इतके विशाल होते की सध्या ज्यांना सर्वात मोठे मनाले जाते ते टायरनोसॉरस रेक्सही त्यांच्यासमोर खुजे दिसावेत!
 
विशेष म्हणजे 76 टन वजनाचे हे डायनासोर शाकाहारी होते आणि एखाद्या अंतराळ्यानाप्रमाणेच वजनदार आणि मजबूत होते. त्यांची सरासरी लांबी 122 फूट इतकी होती. हे डायनासोर इतक्या भव्य आकाराचे असूनही भयावह नव्हते. या प्रजातीचे जीवश्म 2012 मध्ये दक्षिण अर्जेंटिनात मिळाले होते. त्यावेळेपासून त्याबाबत संशोधन सुरू होते व आता त्याची माहिती देण्यात आली आहे. लांब मान असलेल्या शाकाहारी डायनासोरच्या कुळातीलच हे होते.
 
अर्जेंटिनाच्या जीवाश्म संग्रहालयातील संशोधक डियागो पॉल यांनी सांगितले, या डायनासोर समूहातील एका छोटा वर्ग अशा अतिभव्य डायनासोरचा होता.