testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पारंपरिक भविष्यवाणी

lal kitab
शुभमुहूर्त ही भारताची खास वैशिष्टय़पूर्ण संकल्पना आहे. कोणतेही कार्य, शुभ हो अथवा अशुभ, मुहूर्ताशिवाय केले जात नाही.

किताब: भारतात लालकिताब नावाच्या एका पुस्तकाचा बोलबाला आहे. या पुस्तकात हस्तरेषाशास्त्र व ज्योतिष यांची सांगड घातली आहे. या पुस्तकातील भविष्य तंतोतंत जुळते असे म्हणणारे खूप लोक आहेत. या पुस्तकाचे खरे लेखक कोणीतरी वैदिक काळातील ऋषी असावेत असेही म्हणतात. तरीदेखील, वैदिक ज्योतिष व लालकिताब या ग्रंथातील पद्धतीत बरेच फरक आहेत. हे पुस्तक पंडित गिरिधारीलाल शर्मा यांनी 1939 साली (383 पाने) प्रसिद्ध केले. ते पंडित रूपचंदजी जोशी यांनी लिहिले. पण पुस्तकावर त्यानी लेखक म्हणून आपले नाव लिहिले नाही. त्या अर्थी ते त्यांचे मूळ लेखक नसावेत. त्याकाळी काही ताम्रपट लाहोरच्या जुन्या बांधकामात खोदाई करताना मिळाले. त्यावरून हे पुस्तक प्रकाशित केल्याचे मानले जाते. त्यामागोमाग 1940, 1941, 1942 व 1952 साली हे पुस्तक पुन:प्रकाशित झाले. शेवटच्या प्रकाशनात बर्‍याच नव्या गोष्टींची भरती झाली असावी. त्याची पाने वाढून 1173 झाली आहेत. अकबरकाळी भारताच्या जुन्या वैदिक ग्रंथांचे पारशीत भाषांतराचे काम मोठय़ा प्रमाणात झालेले आहे. त्याकाळी भाषांतरित ग्रंथ अरब जगात गेले व अर्वाचीन काळी पुन्हा भारतात येऊन त्यांची हिंदी भाषांतरे झाली असेही मानले जाते. लालकिताब हा ग्रंथ त्यातील उपाय किंवा तोडग्यांसाठी (Totaka) नावाजलेला आहे. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर उद्देश लिहिलेले आहेत ते असे:

1. भाग्यात लिहिलेल्या संपत्तीचा ओघ अडविणारे अडथळे दूर करणे.

2. वर्तमान व भावी संकटांना थांबविण्याचे उपाय सुचविणे.

सामान्य माणूस करू शकेल असे तोडगे, जे आपत्ती निवारणासाठी वापरता येतात, त्यामुळे या पुस्तकाचा प्रचार झाला.

त्यातील काही उदाहरणादाखल दिलेले तोडगे असे :

1. पत्रिकेत सूर्य पहिल्या स्थानात असेल तर लवकर लग्न करा. घरात पाण्याचा नळ बसवा. दिवसा पत्नीशी संग करू नका. गूळ खाऊ नका. परोपकार करा. चारित्र्य शुद्ध ठेवा, माकडाला गूळ खाऊ घाला इत्यादी.

2. चंद्र प्रथमस्थानी असेल तर लाल हातरुमाल जवळ बाळगा. चारपाईला तांब्याचे खिळे ठोका. वडाच्या झाडाच्या मुळांना पाणी घाला. मुलासोबत प्रवास करताना नदीत तांब्याची नाणी टाका. वय 24 ते 27 या काळात लग्न करू नका. हिरवा रंग व मेहुणीपासून दूर राहा. चांदीच्या ताटवाटय़ा घरी बाळगू नका, काचेच्या वस्तू वापरू नका, आईचे आशीर्वाद रोज घ्या.

3. मंगळ प्रथमस्थानी असताना कोणतेही दान स्वीकारू नका. खोटे बोलू नका व साधुसंतांच्या संगतीत राहू नका. हस्तिदंताच्या वस्तू हाताळू नका. महा गायत्री मंत्राचा जप करा व मारुतीला शेंदराचे गंध लावा.

अशी ही यादी खूपच मोठी आहे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

सामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...

national news
पहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...

गणपतीला प्रिय आहे हे फूल

national news
गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...

यामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी

national news
हिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...

कौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा

national news
जेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...

ह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...

national news
ग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...