मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2018
Written By
Last Updated : बुधवार, 19 डिसेंबर 2018 (13:42 IST)

या देशाचा पासपोर्ट आहे जगातील 'सर्वात सामर्थ्यवान', जाणून घ्या भारताची रँकिंग

नुकतेच इंटरनॅशनल सर्व्हे कंपनी हेनली ऍड पार्टनर्सने जगातील पासपोर्टची रँकिंगची सूची काढली केली आहे. यात जपानच्या पासपोर्टला जगातील सर्वात सामर्थ्यवान पासपोर्ट सांगण्यात आले आहे. जेव्हाकी भारताचा पासपोर्ट 81व्या क्रमांकावर आहे.
 
रँकिंगचा आधार असा होता की कोणत्या देशाचा पासपोर्ट किती इतर देशांमध्ये विना विजाने प्रवेश मिळवून देऊ शकतो. जपान जगातील सर्वात अधिक देशांमध्ये विना विजाचे प्रवेश मिळवून देतो. तसेच या वर्षापासून म्यांमारमध्ये विना विजाच्या प्रवेशाची परवानगी मिळाली आहे, त्यानंतर जपानी पासपोर्ट जगातील 190 देशांमध्ये विजा-फ्री एंट्री मिळवण्यात मान्य झाला आहे.
 
जपान ने सिंगापुराला देखील मागे सोडले आहे, ज्याचा पासपोर्ट 189 देशांमध्ये विना विजा प्रवेश मिळवून देतो. जर्मनी (188) तिसर्‍या क्रमांकावर आहे. भारताचा पासपोर्ट 60 देशांमध्ये विजा-फ्री एंट्री मिळवतो. पण मागच्या वर्षाच्या तुलनेत भारताची रँकिंग 6 क्रमांकाने सुधारली आहे, पण 5 वर्षांमध्ये देशाची रँकिंग 5 क्रमांकाने खाली उतरली आहे.
 
मागच्या वर्षी भारत 87व्या नंबर वर होता. हेनली एंड पार्टनर्स 2006 पासून ही पासपोर्ट रँकिंग काढत आहे. 2006 मध्ये भारत 71व्या नंबरावर होता. आतापर्यंत 10 रँकने घसरला आहे. 2015मध्ये भारताची रँकिंग सर्वात खराब 88व्या क्रमांकावर होती.
 
पासपोर्ट रँकिंगला या आधारावर महत्त्वपूर्ण मानण्यात आले आहे की त्याच्या माध्यमाने कुठल्या देशाचे आंतरराष्ट्रीय संबंधांची स्थिती कशी आहे. 12 वर्षांमध्ये यूएईच्या पासपोर्टच्या स्थितीत सर्वात जास्त सुधारणा झाली असून अमेरिका आणि ब्रिटनचे पासपोर्ट संयुक्त रूपेण 5व्या क्रमांकावर आहे.
 
दोन्ही देशांचे पासपोर्ट 186-186 देशांमध्ये मान्य आहे. चीन 71व्या आणि रशिया 47व्या क्रमांकावर आहे. शेजारील देशांमध्ये पाकिस्तान 104व्या आणि बांगलादेश 100व्या स्थानावर आहे. मागच्या वर्षी पाक 102व्या स्थानावर होता. रिपोर्टनुसार - 2006पासून आतापर्यंत संयुक्त अरब अमीरातच्या पासपोर्टने सर्वात जास्त सुधार केला आहे.
 
2006 मध्ये यूएईचा पासपोर्ट 62व्या क्रमांकावर होता. आता हा 21व्या क्रमांकावर आहे. पासपोर्ट रँकिंग 2006पासून काढण्यात येत आहे, तेव्हा भारत 71व्या क्रमांकावर होता.
 
भारताचे पाच वर्षांमध्ये पाच क्रमांक
 
2014 मध्ये 76, 2015 मध्ये 88, 2016 मध्ये 85, 2017 मध्ये 87, 2018 मध्ये 81 क्रमांक मिळविले आहे.