testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Astro Tips : सुख-समृद्धीसाठी 9 सोपे उपाय

astro tips
जर तुम्ही धन-संपती, सुख समृद्धी आणि जीवनात यशस्वी होण्याचे स्वप्न बघत असाल तर या सरळ आणि
सोपे उपायांना आपल्या जीवनात आणा, नक्कीच यश मिळेल.

1. घरात साफ स्वच्छता ठेवल्यानंतर देखील पैसा टिकत नसेल तर शनिवारी काळ्या कुत्र्याला सरसोचे तेल
लावलेली पोळी द्या. मग पहा कधीच पैसाची चणचण राहणार नाही.

2॰ जर कुठल्याही कार्यात यश हवे असेल तर एक लिंबावर 4 लवंगा टाचून ॐ श्री हनुमते नम: मंत्राचा जप
21वेळा करून त्या लिंबाला आपल्या सोबत घेऊन जा, तुमचे काम नक्कीच पूर्ण होतील.
3॰ जर नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर किंवा तुमचे बॉस तुमच्या कामातून प्रसन्न नसतील तर दर रोज

चिमण्यांना 7 प्रकारचे धान्य घालावे. हे तुम्ही पार्क किंवा घराच्या छतावर टाकू शकता.

4॰ जर एखादे काम तुमचे बर्‍याच दिवसांपासून अडकलेले असतील, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची
लवंग आणि सुपारीने पूजा करावी. जेव्हाही कामावर जायचे झाले तर एक लवंग आणि सुपारी आपल्याजवळ
ठेवावी. कामाच्या वेळेस लवंग आपल्या तोंडात ठेवावी. घरी आल्यावर सुपारीला परत गणपतीच्या फोटोजवळ
ठेवून द्यावी. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे फोटोत गणपतीची सूंड़ उजवीकडे असायला पाहिजे.

5॰ जर तुमच्यावर कुठल्याही प्रकाराचे कर्ज असतील आणि तुमच्याकडून त्याला परत फेडणे शक्य नसल्यास
तर मंगळवारी महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावर मसुरीची डाळ चढवून ॐ ऋण मुक्तेश्वर महादेवाय नम:
मंत्राचा जप करावा.

6॰ जर घरातील खर्च कमी होत नसतील तर हातात काळे तीळ घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या
डोक्यापासून पायापर्यंत उतरवून त्याला उत्तर दिशेत फेकून द्यावे.

7॰ घरात सुख-समृद्धीसाठी मातीच्या घड्याला लाल रंग देऊन, त्याच्या तोंडावर दोराबांधून त्यावर नारळ ठेवून
वाहत्या पाण्यात प्रवाहित केले पाहिजे.

8॰ मनासारखे धन लाभ पाहिजे असेल तर घरात लक्ष्मीच्या फोटोसमोर तुपाच्या नऊ वात असलेला दिवा
लावायला पाहिजे.

9. धन लाभ आणि सुख-समृद्धीसाठी लोखंडाच्या भांड्यात पाणी, साखर, तूप आणि दूध मिसळून पिंपळाच्या
झाडावर घालावे.


यावर अधिक वाचा :