testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हे ग्रह सोबत असतील तर पागल होतो माणूस

तसे तर पत्रिकेत सर्व नऊ ग्रह आपापल्या प्रकृतीनुसार कोणत्या ना कोणत्या आजारांची सूचना देतात, पण दोन किंवा दोनापेक्षा जास्त ग्रहांची युती आपला वेगळा प्रभाव टाकते. येथे पत्रिकेत ग्रहांचे असे काही योग आहे ज्यांच्या योगामुळे आजाराचे लक्षण स्पष्ट होतात.


पत्रिकेत जेव्हा सूर्य पहिल्या भावात असेल, सूर्य मंगळ सोबत असतील किंवा सूर्य-शनी एकत्र अथवा सूर्य-शनी आणि मंगळ एकत्र असतील तर अशा व्यक्तीला राग जास्त येतो.


एखाद्याच्या पत्रिकेत जर बुध मंगळासोबत असतील तर अशा व्यक्तीला रक्ताशी निगडित आजार होण्याची शक्यता असते.

तसेच जेव्हा मंगळामुळे बुध जास्त खराब असेल तर ब्लड प्रेशरचा त्रास होतो. मंगळ बुध दोन्ही जर जास्त खराब असतील तर अशा स्थितीत पागलपणाचा आजार होण्याची शक्यता आहे. ग्रहांचा हा योग लिव्हरशी निगडित असतो.

मंगळ शनीच्या योगामुळे गॅसचा त्रास होण्याची शक्यता असते. शनी प्रथम भावात असला तरी गॅसचा त्रास होतो.


सूर्य शुक्रासोबत असेल तर शरीरात स्फूर्तीचा अभाव असतो. हे व्यक्तीच्या यौन क्षमतेला कमी करून देते. जोडीदाराला एखादा आजार होण्याची शक्यता असते.


यावर अधिक वाचा :