1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 6 एप्रिल 2017 (22:15 IST)

ऑटिझम रुग्णांसाठी डीपब्रेन स्टिम्युलेशन ठरली यशस्वी

मुंबईतील जसलोक रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. परेश दोशी व त्यांच्या टिमने ऑटिझम रुग्णांवरील डीप ब्रेन स्टिम्युलेशन हि शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. आशियात दुसऱ्यांदा अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं रूग्णालयातर्फे सांगण्यात आलं आहे. 
ऑटिझम व अपस्माराची रूग्ण असलेल्या 42 वर्षीय पॅमेला या महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत वापर करण्यात आलेले तंत्रज्ञान आधीच्या डीबीएस उपकरणांपेक्षा अधिक प्रभावी आहे. या शस्त्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या बॅटरीचे आयुष्य अत्यल्प होते. मात्र यावेळी बोस्टन सायन्टिफिकच्या नव्या व्हेरसाईस सिस्टिममुळे बॅटरीचे आयुष्य जवळपास 25 वर्षानी वाढले आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान बऱ्याचदा डॉक्टरांना अनेक समस्यांना सामरे जावे लागते. या आजारतील रूग्णांचा परिणाम हा त्यांच्या कुटुंबियांवरदेखील होत असतो. डीबीएस या शस्त्रक्रियेमार्फत त्यांच्यातील मेंदूचे संतुलन साधणे सोपे होत असल्याचे डॉक्टर सांगतात. पॅमेला यांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ऑटिझम हा आजार आहे. या आजारात व्यक्तीला वागणूक, इतरांशी बोलणे, हावभाव किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांशी संवाद साधताना अडचणी निर्माण होतात. जसलोक रूग्णालयात येण्यापूर्वी पॅमेला यांची अवस्था फारच ढासाळली होती. त्यांचा स्वत:च्या परिवारासोबत आक्रमकपणा वाढला. अमेरिकेतल्या बऱ्याच वेगवेगळ्या डॉक्टरांचे शस्त्रक्रियेसाठीचे सल्ले घेतल्यानंतर जर्मनीतील एका डॉक्टरने पॅमेला यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास होकार दिला मात्र काही कारणांमुळे त्यांनी काही दिवसांनी नकार दिला.
 
बऱ्याचदा संवाद केल्यानंतर जसलोक रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या डॉ. अमित देसाई यांनी पॅमेला यांच्या आजारावर अभ्यास केला. त्यानंतर पॅमेला यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकते असा निकष काढण्यात आला. यानुसार पॅमेलावर 7 मार्चला शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली. त्यांची वागणूक, लोकांशी बोलण्याची पद्धत अशा सर्व गोष्टींमध्ये कमालीचा फरक पडला. 
 
मानसिक उपचार बऱ्याचदा केल्यानंतर पॅमेलावर केलेली सर्जरी ही अत्यंत किचकट होती. ऑटिझम वर उपचार केल्यानंतर अपस्माराची रिस्कही लक्षात घेत ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असे न्युरोसर्जन डॉ. परेश दोशी यांनी यावेळी सागंतिले. 
 
जागतिक ऑटिझम डे च्या निमित्ताने या आजारावर पुन्हा प्रकाशझोत टाकला गेला व आमच्या टिमने ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली, असे यावेळी जसलोक रूग्णालयाच्या सीईओ डॉ. तरंग यांनी म्हटले.