शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (16:41 IST)

Expert Advice : अॅसिडिटी किंवा सौम्य हृदयविकाराचा झटका मध्ये काय अंतर आहे जाणून घ्या

आजच्या काळात अॅसिडिटीची समस्या सामान्य झाली आहे. परंतु यासह एक मोठा आजार देखील जन्म घेत आहे, आणि तो आहे किरकोळ हृदयविकाराचा झटका. किंवा मायनर हार्ट अटैक. हे दोन्ही रोग गंभीर आजार आहेत. जर आपण या रोगाला समजून घेऊन त्यावर योग्य उपचार घेतले तर एखाद्याचा जीव वाचू शकतो,नाहीतर काही गंभीर आजार उद्भवू शकतात.उदाहरणार्थ, अॅसिडिटी जास्त असल्यावर रक्तदाब देखील वाढू शकतो. किरकोळ हृदयविकारामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.या दोघांमध्ये फरक कसा करावा, ह्याची कोणती वेगवेगळी लक्षणे आहेत, आहारात काय बदल केले पाहिजे. या सामान्य दिसणाऱ्या आजाराबद्दल वेबदुनिया ने चेस्ट फिजिशियन डॉ.रवी दोसी यांच्याशी विशेष चर्चा केली. डॉ.काय म्हणाले ते जाणून घेऊ या?
 
अॅसिडिटी आणि सौम्य हृदयविकाराचा झटका यात फरक कसा करावा?
 
पोटात ऍसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे अॅसिडिटी वाढते.अॅसिडिटीमुळे पोटात वेदना आणि जळजळ होते. सौम्य हृदयविकाराच्या झटक्यात, हृदयातील एक शिरा अवरोधित होते,ज्यामुळे रक्त साकळून रक्ताची गुठळी तयार होते,रक्ताचा पुरवठा थांबतो आणि वेदना होतात हे दोघे वेगळे आहेत, दोघांचे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने उपचार केले जाते.
 
अॅसिडिटीआणि सौम्य हृदयविकाराची लक्षणे
 
अॅसिडिटीमुळे, छातीच्या मध्यवर्ती भागात दुखण्याची भावना जाणवते,ढेकर येतात,अपचनाची समस्या होते, शौचास व्यवस्थित होत नाही.
 
हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, एखाद्या व्यक्तीला डाव्या हाताच्या बाजूला वेदना जाणवते. वेदना अशी होते की संपूर्ण हातात मुंग्या येतात.या दरम्यान,खूप घाम येतो आणि छातीत वेदना उद्भवते.
 
आहारात बदल
 
ज्यांना अॅसिडिटीची समस्या आहे त्यांनी मसालेदार अन्न खाणे टाळावे.तसेच तळलेले पदार्थ खाऊ नयेत. हृदयविकाराच्या रुग्णाने तळलेल्या आणि चरबी वाढवणाऱ्या गोष्टी टाळाव्यात. कारण जास्त तेल खाल्ल्याने रक्त घट्ट होतं.
 
हृदयविकाराचे रुग्ण व्यायाम आणि योगा करू शकतात का?
 
हृदयविकाराच्या रुग्णांनी केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम आणि योगा करावे. हे फक्त मर्यादित पद्धतीने करू शकतो.तथापि, प्रथम त्यांचे हृदय कशा प्रकारे कार्य करत आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर हृदयाचे कार्य चांगले असेल तर ते व्यायाम आणि योगा करू शकतात आणि हृदयावर वाईट परिणाम झाले असल्यास व्यायाम करू नये.व्यायाम करणे घातक ठरू शकते.