बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (17:48 IST)

कोविड काळात खाण्या-पिण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या

सध्या कोविड ने संपूर्ण जग हैराण झाले आहे. या संसर्गाला लढा देण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहे. जर एखाद्याची प्रतिकारशक्ती, किंवा रोगांविरूद्ध लढण्याची क्षमता कमकुवत असेल तर हा विषाणू त्या लोकांना वेढतो. यासाठी  स्वतःकडे लक्ष देणे आणि खाण्या-पिण्याच्या आणि जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. चला काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
 
कोरोनाव्हायरस टाळण्यासाठी दररोजची जीवनशैली, शारीरिक क्रियाकलाप आणि खाण्या-पिण्याची काळजी घेण आवश्यक आहे. आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा ज्यामध्ये अँटिव्हायरल गुणधर्म आहे. जेणे करून आपली प्रतिकारक शक्ती बळकट राहील आणि आपला शरीर सर्व प्रकाराच्या आजारांपासून वाचून राहील.
 
कोरोनाव्हायरसचा सामना करण्यासाठी दररोजच्या नित्यक्रमात व्यायामाचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे, म्हणून योगाला  नियमितपणे आपल्या दिनचर्येत सामील करा.
 
अँटिव्हायरल आणि अँटीइंफ्लेमेट्री गुणधर्म असलेल्या गोष्टींचे सेवन करा. या साठी आपण दररोज तुळशीचे सेवन करू शकता. हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करेल. तुळशीची 5 पाने दररोज 1 चमचा  मध आणि 3-4 काळी मिरी घालून खा, हे  रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.
 
घराच्या दाराला स्पर्श केला असेल तर घरातील इतर गोष्टींना स्पर्श करण्यापूर्वी आपले हात साबणाने चांगले धुवा आणि त्यानंतरच इतर कोणत्याही गोष्टींना स्पर्श करा.
 
घरात रेफ्रिजरेटरमध्ये भाज्या किंवा फळे ठेवण्यापूर्वी प्रथम ते स्वच्छ करा. यासाठी मीठ आणि एप्पल सायडर व्हिनेगर गरम पाण्यात मिसळा. या घोळाने भाज्या धुवा, नंतर त्यांना पुन्हा फ्रीजमध्ये ठेवा.
 
आपण होममेड फेसमास्क वापरत असल्यास, नंतर त्यांना  नियमितपणे वेळोवेळी धुवा आणि मगच त्यांचा वापर करा. जास्त वेळ न धुता घरात बनवलेले फेसमास्क वापरू नका.