शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

आदर्श वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधीची माहिती आवश्यक आहे!

WD
आयुर्वेदातील प्राचीन ग्रंथ चरक संहितेत संतती आणि बुद्धीसंततीचे वर्णन आहे. सुसंततीसाठी रसायन औषधींची माहितीही त्यात आहे. आयुर्वेद आणि योगशास्त्रात सुसंततीसाठी काही गोष्टींची माहिती आहे. आयुर्वेदात सुसंततीसाठी आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. चरक संहितेच्या अतुलगोत्रीय अध्यायात मैथुन अर्थात सेक्ससाठी योग्य आणि अयोग्य स्त्रीचे वर्णन आहे. विकृत मानसिक अवस्थेतून निपजणा-या विकृत संतानांच्या उत्पत्तीचेही वर्णन आहे. तसेच सुसंततीसाठी मार्गदर्शनही आहे.

आयुर्वेदात कुटुंबनियोजनाविषयी खूप माहिती नाही, कदाचित त्या काही कुटुंबनियोजनाची इतकी आवश्यकता नसावी. आपल्या ग्रंथांमध्ये गर्भस्थापना आणि प्रजास्थापन द्रव्य याविषयी माहिती आहे. 18 व्या शतकानंतरच्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मात्र संतती नियमनविषयक बरीच माहिती आहे. अशाच काही आयुर्वेदिक ग्रंथांतून संकलित केलेली माहिती येथे दिली आहे. तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याविषयीचे प्रयोग करावेत.

- आयुर्वेदात गर्भनिरोधासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. याने कुटुंबनियोजन करणे शक्य आहे.

आर्तव दर्शन किंवा मासीक पाळी (1 ते 4 दिवस). नंतर ऋतुकाल 12 दिवसाचा काळ (5 ते 17 दिवस). हा काळ आचार्यांनी गर्भ उत्पत्तीसाठी अनुकूल असल्याचे म्हटले आहे. यानंतरचा 9 ते 13 दिवसांचा काळ (18 ते 28 दिवस) ऋतुव्यतीतकाल मानण्यात आले आहे. ऋतुकालात सेक्स केल्याने गर्भधारणा होते. ऋतुव्यतीत काळात सेक्य केले तरी गर्भधारणेची जवळपास शक्यता नसते. आधुनिक विज्ञानानेही हे मान्य केले आहे. ऋतुव्यतीत काळाला आधुनिक विज्ञानाने सेफ पिरीयड मानले आहे.

- महर्षी चरक यांनी स्त्रीला विविध शारीरिक स्थितीत ठेवून तिच्याशी सेक्स करण्याला चुकीचे मानले आहे. या स्थितीत सेक्स करणे धोकादायक असू शकते असे चरक महर्षींनी म्हटले आहे. उजवीकडे किंवा डावीकडे झोपवून सेक्स करणे हानीकारक असल्याचे म्हटले आहे.

- महर्षी पतंजली यांनी सांगितल्यानुसार नासिका किंवा नाडी शोधन करून आपण आपल्या इच्छेनुसार संतान प्राप्त करू शकतो.

स्त्री पुरुषांनी वैवाहिक जीवन सुखमय करण्यासाठी या गोष्टी विसरू नय
एखाद्या गोष्टीचा पाया ठिसूळ असेल किंवा असत्यावर आधारलेला असेल तर त्या गोष्टीचा नाश व्हायला वेळ लागत नाही. नातेसंबंधांचेही असेच आहे. नात्यात निरसता येऊन नवरा बायकोत निराशा येण्यामागेही हेच कारण आहे. वैवाहिक जीवनात या समस्या सर्रास आढळून येत आहेत.

अधिकांश विवाहित जोडप्यांत छोट्या छोट्या गोष्टींवरून कलह होणे आता नवलाचे राहिलेले नाही. परंतु काही वेळा याचे रूपांतर मन विदीर्ण होण्यात होऊ शकते. याने जीवनातील सुख हरवून जाऊ शकते.

साधारणपणे या भांडणामागे आपसातील सामंजस्य कमी असणे हे कारण असते. सामंजस्य नसण्यामागे दोघांचाही कामाचा वाढता व्याप कारण असू शकेल. नवरा दिवसभर ऑफिस आणि बाहेरच्या कामांत इतका व्यस्त असतो की घरी आल्या आल्या त्याला थकल्यासारखे होते. बायको घरातील कामांत बुडालेली असते. नवरा बायको दोघेही नोकरी करीत असतील तर भांडण होण्याचे प्रमाण अधिक असते.

ND
या भांडणांपासून सुटक होण्यासाठी आणि वैवाहिक जीवनात सुख समाधान नांदण्यासाठी योगीक जीवनशैलीचा अंगीकार करणे खूप महत्त्वाचे आहे.

- नियमीत योग केल्याने दिवसभर मनाची शांतता टिकून राहते.

- काम करण्याची क्षमता वाढते. दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

- आरोग्य चांगले राहते.

- मन शांत राहिले म्हणजे जोडीदाराशी सामंजस्य आपोआपच निर्माण होते.

- अनेकदा भांडणाच्या मुळाशी क्रोध असतो. योगामुळे क्रोध नियंत्रणात राहतो.

- ध्यानात ठेवा योग म्हणजे केवळ योगासन नव्हे; यम, नियम, योगासन, प्राणायाम आदी संकल्पनांचा अभ्यासही महत्त्वाचा आहे.