शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

धूम्रपानामुळे प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम

धूम्रपानामुळे माणसाच्या शरीराच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आलेय. तसेच धूम्रपानामुळे पुरुषांना वंध्त्वाचा धोका असल्याची माहितीही समोर आलीये. 30 ते 50 टक्के पुरुषांमध्ये वंध्त्वाचे कारण धूम्रपान असल्याचे समोर आलेय. 
 
ब्राझीलच्या साओ पावलो फेडरल युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ लेखक आरपी बेटरेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, धूम्रपानामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेला नुकसान पोहोचत असल्याचे अभ्यासातून समोर आलेय. संशोधनानुसार, धूम्रपान करणार्‍या पुरुषांच्या शुक्राणूमध्ये बदल झालेले पाहायला मिळाले.