शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2015 (15:59 IST)

प्रौढांमधील मधुमेहाच्या तीन उपप्रकारांचा शोध

शास्त्रज्ञांनी प्रौढांमध्ये आढळणार्‍ा किंवा वैद्यकीय परिभाषेत टाइप 2 म्हणून ओळखल्या जाणार्‍ा मधुमेहाचे तीन उपप्रकार शोधून काढले असून त्याच्या आधारावर अधिक परिणामकारक आणि नेमके उपचार करता येतील, असा आशावाद शास्त्रज्ञांच्या या गटाचे प्रमुख जोएल डडली यांनी व्यक्त केला.


 
या विषयावर माउंट सिनाई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेतील शास्त्रज्ञांनी संशोधन केले. त्याचे निष्कर्ष सायन्स ट्रान्स्लेशनल मेडिसीन नावाच्या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले. या शास्त्रज्ञांनी टाइप 2 मधुमेहाच्या 11,000 रुग्णांच्या माहितीचे विश्लेषण केले. त्यात अन्य माहितीबरोबरच रुग्णांच्या जनुकीय रचनेबाबतही माहिती होती. अभ्यासात असे दिसून आले की, मधुमेहाचा परिणाम या रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारे होत होता. पहिल्या प्रकारात रुग्णांना मूत्रपिंड आणि डोळ्यांवर परिणाम झाला होता. दुसर्‍ा प्रकारात चेतासंस्थेचे विकार आणि विविध प्रकारच्या अँलर्जी झाल्या होत्या. तर तिसर्‍ा प्रकारात रुग्णांना एचआयव्हीची बाधा अधिक प्रमाणात झाली होती. या तिन्ही प्रकारच्या रुग्णांमधील जनुकीय रचनाही विशिष्ट प्रकारची होती. त्यानुसार आता टाइप-2 मधुमेहाचे तीन उपप्रकार पाडण्यात आले आहेत. या संशोधनाचा वापर करून मधुमेहावर अधिक अचूक व परिणामकारक उपाय करता येतील.