शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

बाळ गर्भाशयातही देते जांभई....

WD
गर्भाशयात असलेले बाळ केवळ उचकी देणे, थुंकी गिळणे आणि अवयवांची हालचालच करीत नाही, तर जांभईही देते, असे नवीन संशोधनातून सिद्ध झाले आहे.

संशोधन करताना गर्भाशयात असलेल्या 15 सुदृढ बाळांच्या 4 डी स्कॅनचा अभ्यास करण्यात आला. बाळांच्या आरोग्याची माहिती घेण्यासाठी जांभईचा निश्चितच उपयोग होऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले आहे. बाळ गर्भाशयात असताना जांभई देते की नाही, यावर संशोधकांमध्ये मतभेद होते. गर्भाशयात असताना बाळ केवळ तोंड उघडण्याचा प्रयत्न करतो आणि ती विकासाची एक प्रक्रिया आहे, असे काही संशोधकांचे मत होते.

'प्लोस वनं या जर्नलमध्ये ब्रिटिश संशोधकांनी केलेले हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. गर्भाशयातील बाळ किती तोंड उघडते यावरून ते जांभई देते, की नाही, याचा शोध लावण्यासाठी हा अभ्यास करण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.