शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

भारताला कोलेस्टरॉलशी संबंधित मार्गदर्शक तत्वांचा विचार करणे आवश्यक

– डॉ. श्रीनाथ रेड्डी

PR
एशियन हार्ट इन्स्टिट्युटने दोन लाख रुग्णांवर उपचार केल्याचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया आणि वर्ल्ड हार्ट फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीनाथ रेड्डीय म्हणाले की, भारत ही मधुमेहाच्या संदर्भात जगाची राजधानी असल्यामुळे स्टॅटिन औषधे भारतात कधी देण्यात यावीत याबाबत भारताने स्वत:ची मार्गदर्शक तत्वे तयार करणे आवश्यक आहे.

“हृदय रोग आढळण्याचे वय भारतात ५२, चीनमध्ये ६३ तर अमेरिकेत ६२ असल्यामुळे कोलेस्टरॉल मार्गदर्शक तत्वांचा विचार करता भारत एका वेगळ्या धाटणीच्या गटात आढळत असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले. हृदयरोगाच्या व्यवस्थापनासाठी जगभरात अनेक देशांनी त्यांनी स्वत:ची अशी कोलेस्टरॉल मार्गदर्शक तत्वे ठरविली आहेत. आजही हृदयरोग हा जगभरात होणाऱ्या मृत्युंसाठी कारणीभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी स्टॅटिन्स ही औषधे आहेत. त्यामुळे कोलेस्टरॉल मार्गदर्शक तत्वांचे लक्ष हे नेहमीच “स्टॅटिन घेण्यास सुरुवात करण्याची योग्य वेळ कोणती” यावर केंद्रित झाले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात कोलेस्टरॉल मार्गदर्शक तत्वांचे उदारीकरण झालेले आढळते. नोव्हेंबर २०१३ मध्ये द अमेरिकन हार्ट असोसिएशनने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, १० वर्षांच्या कालावधीत ज्या व्यक्तींना हृदयरोग होण्याची शक्यता ७.५ टक्के आहे, त्या व्यक्तींना स्टॅटिन औषधे देण्यात यावीत, तर ब्रिटिश मार्गदर्शक तत्वांनुसार याच कालावधीत हृदयरोगाची शक्यता १० टक्के आहे अशा व्यक्तींना ही औषधे देण्यात यावीत, असे नमूद करण्यात आले आहे.

असे असले तरी भारतात मधुमेह मोठ्या प्रमाणावर आढळतो. वैद्यकीय चाचण्यांच्या विश्लेषणानुसार स्टॅटिनमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

“औषधांचा वापर करून अथवा राहणीमानात बदल करून कोलेस्टरॉलची पातळी कमी केल्यास हृदयरोग होण्याची शक्यताही कमी होते. हृदयरोगाचा सामना करण्यासाठी निरोगी जीवनशैलीला स्टॅटिन औषधे हा पर्याय नव्हे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले.

याच संदर्भात पुढे डॉ. रेड्डी म्हणाले, “न्यूझीलंड आणि ब्रिटिश येथील कोलेस्टरॉल मार्गदर्शक तत्वे संपूर्ण धोकादायक घटकांवर (रुग्णाला धोकादायक ठरणारे विविध घटक) लक्ष केंद्रित करतात तर अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मार्गदशर्क तत्वांमध्ये विशिष्ट धोकायदायक घटकांवर (एका रुग्णाला दुसऱ्या रुग्णाहून कशा प्रकारे धोका अधिक आहे) लक्ष केंद्रित करण्यात येते. कमी तीव्रतेच्या स्टॅटिन उपचारपद्धतीवर एएचए मार्गदर्शक तत्वांमध्ये भर देण्यात आलेला नाही. भारतासारख्या मधुमेहबहुल देशात नेमके हेच गरजेचे आहे.

भारतीयांमध्ये शरीरात मेदाचे अधिक प्रमाण असणे, शरीराच्या वरच्या भागात मेद साचण्याचे प्रमाण अधिक असणे, इन्सुलिनला प्रतिकार करणे, कमी घनता असलेल्या लायपोप्रोटिनचे (अपायकारर कोलेस्टरॉल) अस्तित्व असणे इत्यादी अनेक गुणवैशिष्ट्ये आढळून येतात.

त्यामुळे भारताने अधिक चांगली धोरणे, आहार, राहणीमान आणि हृदयरोगाचा सामना करण्यासाठी शिक्षण देणे अशा विविध आघाड्यांवर विचार करणे आवश्यक आहे.