शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By
Last Updated : गुरूवार, 6 मार्च 2014 (16:57 IST)

शरीरात रक्त वाढविणारे पदार्थ

आज ६0 ते ८0 टक्के महिला अँनेमियाचे (रक्ताल्पता) शिकार आहे. भोजनाचे असंतुलन आणि हिमग्लोबीनची कमतरता यांनी हा रोग वाढत जातो. शरीरामध्ये रक्ताची कमतरता ३ प्रमुख कारणांनी होते. 
 
१) लोहतत्त्वाची कमतरता 
 
२) पोलिक अम्लाची कमतरता 
 
३) व्हिटॅमिनची बी-१२ ची कमतरता शरीरात रक्ताची कमतरता झाल्यास आहारामध्ये हिरव्या शाक भाज्यांचे मिश्रण भरपूर मात्रेत असावे. रक्ताल्पतेत पुढील पदार्थ फायदेशीर ठरतात. 
 
४) केळे - प्रात:काळी तीन केळी खाऊन दुधामध्ये साखर, इलायची मिसळून नित्य पित राहण्याने रक्ताची कमतरता दूर होते. हा एक पौष्टिक नाश्ता आहे.
५) द्राक्षे - १0 औंस द्राक्षांचा रस पित राहण्याने रक्ताल्पतेत लाभ होतो 
 
६) लिंबू - ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल अशा लोकांनी लिंबू आणि टोमॅटोचा भोजनामध्ये समावेश केल्यास लाभ होतो. 
 
७) आवळा - अर्धाकप आवळय़ाच्या रसामध्ये २ चमचे मध आणि थोडेसे पाणी मिसळून पिण्याने लाभ होतो. 
 
८) बेल - बेलाचा सुका गर वाटून घ्यावा. गरम दुधामध्ये याचे २ चमचे आणि स्वादानुसार वाटलेली खडीसाखर मिसळून प्यावे. हे एक चांगले रक्तवर्धक टॉनिक आहे. 
 
९) बीट - बीट रक्त वाढविते. 
 
१0) गाजर - २५0 ग्रॅम गाजराच्या रसामध्ये पालकाचा रस मिसळून प्यावे.
 
११) कांदा - कांद्याचा रस अथवा कच्चा कांदा खाण्याने रक्त वाढते, कारण कांद्यामध्ये लोह भरपूर मात्रेत असते. 
 
१२) दही - दह्याची लस्सी नित्य पिण्याने दुर्बलता दूर होते. 
 
१३) मध - रक्ताच्या कमतरतेत दिवसातून ३ वेळा मध पाजावे.
 
१४) पालक - अर्धा ग्लास पालकाच्या रसात २ चमचे मध मिसळून ५0 दिवसांपर्यंत प्यावे. याने शरीरामध्ये रक्ताची वृद्धी होते.