शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2015 (13:54 IST)

शौचालयापेक्षाही टॉवेलवर अधिक जंतू

वॉशिंग्टन। ज्या टॉवेलचा आपण स्वच्छतेसाठी वापर करतो त्याच टॉवेलच्या माध्यमातून विविध रोगांचा प्रसार होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. कारण टॉवेलवर एखाद्या शौचालयापेक्षाही रोगजंतूचे वास्तव्य अधिक असल्याचे धक्कादायक निष्कर्ष एका ताज्या अभ्यासातून समोर आले आहेत. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापरल्या जाणार्‍या टॉवेलच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.





अॅरिझोना विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने केलेल्या एक नव्या अभ्यासादरम्यान आपण दररोज वापरत असलेल्या टॉवेलवर अतिसारासह इतर संसर्गजन्य आजारांच्या जंतूंचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले आहे. पाणी शोषून घेण्याच्या क्षमतेमुळे टॉवेलवर रोगजंतूंची पैदास होत असल्याचे अभ्यासादरज्ञ्यान निदर्शनास आले आहे.

घरातील रोगजंतूकारक ठिकाणांच्या सफाईसह शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या स्वच्छतेसाठी टॉवेलचा वापर केला जातो. यावेळी टॉवेलवर तेथील जंतूंचा शिरकाव होतो. ओलसरपणामुळे तेथे या रोगजंतूंची पैदास होण्यास अनुकूल वातावरण तयार होते. त्यामुळे टॉवेलच्या माध्यमातूनच संसर्ग पसरण्याची शक्यता बळावत असल्याचे या अभ्यासाचे प्रमुख चार्ल्स गेर्बा यांनी सांगितले.

विशेष म्हणजे केवळ टॉवेल धुऊन काढल्याने किंवा वाळत घातल्याने त्यातील रोगजंतू नष्ट होत नाही. उच्च तापमानातील पाण्यातच हे रोगजंतू नष्ट होतात. त्यामुळे टॉवेलच्या माध्यमातून रोगजंतूंचा संसर्ग होऊ द्याचा नसेल तर तो दररोज गरम पाण्यात धुणे आवश्यक असल्याचा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. यासाठी साधारणात 90 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत पाणी गरम असावे असेही त्यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व व्यक्तींनी एकच टॉवेल न वापरता वेगवेगळे टॉवेल वापरावे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होत असल्याचे ते म्हणाले.