सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (10:51 IST)

Benefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, जाणून घ्या 7 फायदे..

जगभरातील चहाप्रेमींची कमतरता नाही. चहाचे वेगवेगळे स्वाद आणि प्रकार त्यांचा फायद्यासाठी ओळखले जातात. पण आपणास ठाऊक आहे का की ब्लॅक टी देखील खूप फायदेशीर असतो. तर जाणून घ्या या चहाचे फायदे - 
1 हृदयासाठी फायदेशीर : होय, ब्लॅक टी आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज एक कप ब्लॅक टी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या मधील असलेले फ्लेवेनॉयड्स एलडीएल कॉलेस्ट्राल कमी करत. या व्यतिरिक्त काळ्या चहाचा वापर हृदयाचा रक्तवाहिनींना निरोगी ठेवण्यास मदत करतं आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया देखील कमी करण्यास मदत करतं.
 
2 कर्क रोग : आपल्या आहारात दररोज ब्लॅक टी घेऊन आपण प्रोस्टेट, डिम्बग्रंथि आणि फुफ्फुसाचा कर्करोग टाळू शकता. काळ्या चहाचा वापर शरीरातील कर्करोगाच्या पेशींचा नायनाट करण्यास मदत करतात. हे स्त्रियांमधील होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या शक्यतेला कमी करून    तोंडाच्या होणाऱ्या कर्करोगापासून देखील संरक्षण करण्यास मदत करतं.
 
3 मेंदूसाठी : मेंदूच्या पेशींना निरोगी ठेवण्यासाठी तसेच त्यामधील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी काळा चहा पिणं खूप उपयुक्त आहे. दिवसातून सुमारे 4 कप काळ्या चहाचे सेवन करून तणाव कमी करू शकता. हे मेंदूला तीक्ष्ण करून स्मरणशक्तीत वाढ करते आणि आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक सतर्क आणि सक्रिय बनवते.
 
4 पचन : काळ्या चहामध्ये असलेले टॅनिन पचन साठी खूप फायदेशीर असतं. गॅस व्यतिरिक्त हे पचनाशी निगडित इतर समस्यांमध्ये देखील खूप फायदेशीर असतं. तसेच अतिसारच्या परिस्थितीत काळ्या चहाचे सेवन खूप फायदेशीर आहेत.
 
5 ऊर्जा : दररोज काळा चहा पिण्याचा एक उत्तम फायदा म्हणजे हे प्यायल्यामुळे आपणास अधिक ऊर्जावान जाणवतं आणि शरीर अधिक सक्रिय राहतं. काळ्या चहामध्ये असलेले कॅफिन, कॉफी किंवा कोलापेक्षा जास्त फायदेशीर असतं आणि आपल्या मेंदूला सतर्क ठेवत. जेणे करून आपल्या शरीरात ऊर्जेचं प्रसरण सतत होत राहत.
 
6 कॉलेस्ट्राल : हे आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रालची पातळी कमी करतं, ज्यामुळे आपले वजन हळू-हळू कमी होऊ लागतं. या व्यतिरिक्त या मध्ये फॅट कमी प्रमाणात असतं. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतं नाही. हे शरीरातील चयापचय (मेटाबॉलिझम) प्रक्रियेस वाढविण्यास उपयुक्त आहे जे वजन कमी करण्यास मदत करतं.
 
7 त्वचा : ब्लॅक टी चे सेवन केल्यामुळे आपल्याला त्वचेच्या समस्येपासून, विशेषतः संक्रमणापासून वाचविण्यात मदत करतं. या व्यतिरिक्त हे सुरकुत्यांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करतं आणि यामधील असलेले अँटीऑक्सीडेंट घटक, त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्यास ही उपयुक्त आहे.