शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (10:00 IST)

Covid-19 : या 10 वस्तूंनी वाढवा इम्युनिटी, महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अनेक उपाय अमलात आणले जात आहे. परंतू जर आपण आंतरिक रूपाने मजबूत असाल तर संक्रमणाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही. आंतरिक मजबुती म्हणजे आपली इम्युनिटी सिस्टम अर्थात रोग प्रतिकारक शक्ती मजबूत असणे. 
 
आता आपल्याला प्रश्न पडत असणार की कोणत्या वस्तूंनी इम्युनिटी वाढवता येऊ शकते. तर आम्ही काही अशा पदार्थांबद्दल माहिती पुरवत आहोत ज्याने आपली प्रतिकारक शक्ती वाढू शकते- 
 
दालचिनी
मसाल्यात आढळणारी दालचिनी आपण स्वाद वाढवण्यासाठी करतच असाल पण आरोग्यासाठी देखील दालचिनी खूप फायदेशीर आहे. यात अनेक अँटीऑक्सीडेंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुण आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतील. आपण दालचिनी काढा, चहा‍ किंवा पाण्यात मिसळून सेवन करू शकता.
 
आलं
आल्यात अँटीऑक्सीडेंट्स आणि अँटीइंफ्लेमेट्री गुण आढळतात, ज्याने अनेक आजार बरं करण्याची क्षमता असते. आपल्याला सर्दी किंवा खोकला होत असल्यास आल्याचा लहानसा तुकडा सर्व समस्यांवर फायदेशीर ठरतो. याचे आपण नियमित रूपाने सेवन करू शकतात. हवं असल्यास आपण आल्याचा चहा किंवा आल्याचा काढा तयार करू सेवन करू शकता. आपण आल्याचा तुकडा देखील खाऊ शकता.
 
लवंग
यात अँटीऑक्सीडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुण आढळतात. याने आरोग्याशी निगडित अनेक समस्या दूर होण्यास मदत ‍मिळते. खोकला येत असल्यास लवंग खाल्ल्याने आराम ‍मिळतो. सर्दी-खोकल्यावर लवंग अत्यंत फायदेशीर ठरते.
 
आवळा
आवळा व्हिटॅमिन-सी चा एक चांगलं स्रोत आहे. आवळा इम्युन सिस्टम मजबूत करण्याचं काम करतं. सौंदर्य लाभासाठी हे उत्तम मानले गेले आहे तसेच आरोग्यावर देखील आवळ्याचे चांगले परिणाम दिसून येतात.
 
अश्वगंधा
आयुर्वेदिक औषधी अश्वगंधा अनेक आजारांवर उपयोगी असल्याचे म्हटले गेले आहे. याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
 
लसूण
घरातील स्वयंपाकघरात आढळणारं लसूण खाद्य पदार्थांचे स्वाद दि्गुणित करतं तसेच आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. याचे रिकाम्या पोटी नियमित सेवन केल्याने इम्युनिटी मजबूत होते आणि अनेक आजार दूर होतात.
 
तुळस
तुळसचे अनेक फायदे आहेत. आरोग्यासाठी तुळस लाभदायक आहे. रिकाम्या पोटी तुळशीचे सेवन केल्याने सर्दी-खोकला, ताप, न्युमोनिया आणि बद्धकोष्ठता सारखे आजार नाहीसे होतात.
 
हळदीचं दूध
हळदीचं दूध नियमित सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी-खोकल्या सारख्या समस्यांवर हळद घातलेलं दूध हळद प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. झोपण्यापूर्वी नियमित याचे सेवन केल्याने इम्युन सिस्टम मजबूत राहण्यास मदत मिळते.
 
ग्रीन टी
ग्रीन टी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायद्याचे मानले गेले आहे. याचे नियमित सेवन केल्याने रोगांना लढा देण्यास मदत होते.
 
गिलोय
गिलोय इम्युन सिस्टमला मजबूत ठेवण्यास फायद्याचं ठरतं. हे निरोगी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. याचे सेवन केल्याने शरीरात संक्रमणाशी लढण्याची क्षमता मजबूत होते.