हृदयाची काळजी घेणारे हिरवे वाटाणे  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  हिवाळ्यात बाजारात हिरव्या वाटण्याच्या शेंगा हमखास पाहायला मिळतात. खाण्याच्या विविध पदार्थात रंगत आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाटण्यांमध्ये अनेक पोषकद्रव्ये आढळतात. तसेच आरोग्यदृष्ट्या वेगवेगळ्या समस्यांपासून दूर राहण्यासही हिरव्या वाटण्याचा आहारात नियमित समावेश केल्याने चांगला उपयोग होतो. वाताण्यातील आरोग्यदायी गुण खालीलप्रमाणे,
				  													
						
																							
									  १) व्हिटामीन ‘के’:- हिरव्या वाटण्यांमध्ये व्हिटामीन ‘के’ भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात. हे व्हिटामीन ऑस्टियोपोरोसिस च्या विरोधात चांगले काम करते. एकूणच हिरवे वाटाणे एक पॉवर बुस्टरसारखे काम करते आणि चांगले आरोग्य राखण्याच्या दृष्टीने उपयोगी खाद्य आहे.				  				  २) कोलेस्टेरॉल दूर ठेवते:- हिरव्या वाटण्यात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढू न देणारे आरोग्यदायी घटक असतात. हिरव्या वाटाण्यात शरीरात ट्रायग्लिसरीन कमी करणारे गुण असतात. आणि याच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राहते. शरीरातील अनेक व्याधीही वाटाण्याच्या नियमित सेवनाने दूर होतात.				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  ३) हृदयाची काळजी घेते:- हिरव्या वाटाण्यांच्या नियमित सेवनाने हृदयविषयक समस्याही दूर होतात. यातील एन्टी इंफ्लेमेट्री कंपाउंड आणि भरपूर प्रमाणात असलेले एन्टी ऑक्सिडेंट कंपाउंड ह्या दोघांच्या कोंबीनेशनमुळे हृदयविषयक आजारांचा धोका कमी होतो.				  																								
											
									  ४) वजन कमी करणारे गुण:- हिरव्या वाटाण्यात उच्च फायबर भरपूर प्रमाणात असते ज्याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळते मात्र चरबी वाढत नाही.				  																	
									  ५) विसरण्याच्या समस्येपासून सुटकारा देते:- बऱ्याच लोकांना अल्जाइमर हा रोजच्या गोष्टीही विसाराविणारा आजार असतो. हिरव्या वाटाण्याच्या नियमित सेवनाने हा आजार बरा होतो. तसेच ऑस्ट्रीयोपोरोसीस आणि ब्रोंकाइटीस अशा समस्यांशी लाधाण्यासही मदत होते.				  																	
									  ६) ब्लडशुगर संतुलित ठेवते:- हिरव्या वाटाण्यातील उच्च फायबर आणि प्रोटीन शरीरातील ब्लड शुगर चे प्रमाण नियंत्रित ठेवते.