मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Health Benefit Of Kaju : आरोग्यदायक गुणधर्म असलेले काजूचे फायदे जाणून घेऊ या..

सुके मेवे मधील असलेले काजू सर्वात जास्त चविष्ट मेवा आहे, ज्याचा उपयोग भाजीच्या ग्रेव्ही, विविध पक्वान्न आणि विशेष म्हणजे काजू कतली बनविण्यासाठी केले जाते. केवळ चवच नव्हे तर काजू आरोग्य आणि सौंदर्याचे खास फायदे देतात. जाणून घेऊ या..
 
1 सुके मेवे देखील खूप फायदेशीर असतात. या पैकी काजू आपल्याला ऊर्जा देण्यास मदत करतं आणि प्रथिनं आणि व्हिटॅमिन बी चे उत्कृष्ट स्रोत असतात.
 
2 या मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतं जे मेंदूंसह त्वचेसाठी देखील फायदेशीर असत. हे आपल्या त्वचेला तजेल बनवतं आणि ताण दूर करतं.
 
3 या मध्ये मोनो सेंच्युराईड्स असतात, जे हाडं तसेच हृदयाला देखील निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यास मदत करतं. या व्यतिरिक्त काजू कॉलेस्ट्राल कमी करण्यात फायदेशीर आहे.
 
4 काजू हा आयरन(लोह)चा चांगला पर्यायी आहे. हे लोह किंवा आयरनची कमी पूर्ण करण्याबरोबरच अशक्तपणाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
 
5 थंड प्रकृती असणाऱ्यांना काजू खूप फायदेशीर आहे कारण काजू उष्ण प्रकृतीचे आहे. हे शक्तिवर्धक आणि वीर्यवर्धक आहे.