मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (22:28 IST)

शरीरात ही चिन्हे दिसली तर लगेचच चाचणी करून घ्या अन्यथा हा फुफ्फुसाचा कर्करोग देखील असू शकतो

बहुदा या क्षणाला सर्वांना माहीतच आहे की कर्करोग एक गंभीर आजार आहे परंतु कर्करोगामध्ये एक फुफ्फुसाचा कर्करोग असतो. याबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे. आज फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे.
 
या मागील एक कारण असे देखील आहे. की लोकांना या कर्क रोगाविषयी कमीच माहिती असावी ज्यामुळे ते दुर्लक्ष करतात आणि या आजारास बळी पडतात.
 
आज आम्ही आपणांस या कर्करोगाचे लक्षण आणि बचाव बद्दल सांगत आहोत.
 
फुफ्फुसांच्या कर्करोगाची प्रारंभिक लक्षणे -
 
जर आपणांस खालीलपैकी काहीही लक्षणे दिसल्यास आपण वेळ न गमावता त्वरित विशेषज्ञाशी संपर्क साधावा. कारण हा फुफ्फुसांच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतात.
 
दीर्घकाळापर्यंत खोकला येणं किंवा खोकतांना आवाजात बदल होणं. श्वास घेताना शिट्टी वाजण्यासारखी आवाज येणं. खोकतांना तोंडातून रक्त येणं किंवा थुंकीचा रंग बदलणं.
 
डोक्यात वेदनेसह चक्कर येणं आणि शारीरिक अशक्तपणा जाणवणं. वजन कमी होणं आणि भूक न लागणं. शरीराच्या विविध भागांना जसे की चेहरा, हात, मान आणि बोटांवर सूज येणं . 
 
जे लोकं सिगारेट ओढतात त्यांना 15 ते 30 पटीने जास्त फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तथापि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये देखील फुफ्फुसांच्या कर्करोगाचा प्रभाव वाढताना दिसून येत आहे. फुफ्फुसाचा कर्करोगाचे लक्षण वेगळे असतात. जिथे हा पसरतो तिथल्या प्रभावित पेशींच्या प्रकारावर अवलंबून असतो. तसेच या वर देखील अवलंबून असतो की गाठ किती मोठी आहे.
 
काही प्रकारचे कर्करोग आपले लक्षण तो पर्यंत दाखवत नाही जोपर्यंत शेवटचा टप्प्यात येत नाही. अश्या प्रकारच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी चाचणी करून लवकरच सुरवातीच्या लक्षणांना ओळखणे महत्त्वाचे आहे.