बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (10:21 IST)

हिवाळ्यात या हे 10 पदार्थ आहारात सामील करा, इम्युनिटी वाढवा

सध्या कोरोनाच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यासाठी लोक योग आणि आयुर्वेदिक काढ्याला आपल्या जीवनशैलीत समाविष्ट करत आहेत. काढ्याच्या व्यतिरिक्त अनेक असे खाद्य पदार्थ आहे, ज्यांचा नियमितपणे सेवन केल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते. तसेच सध्या हिवाळा सुरू होत आहे त्यामुळे बदलत्या हंगामात शरीरास बळकट करण्यासाठी, आपल्या आहारात काही विशेष पदार्थांचे समावेश करणे आवश्यक आहे.
 
1 ग्रीन टी आणि ब्लॅक टी - ग्रीन आणि ब्लॅक टी दोन्ही आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यासाठी फायदेशीर असते. पण लक्षात असू द्या की हे फक्त एक किंवा दोनच कप प्यावे. याचा अधिक सेवनाने आपली भूक कमी होऊ शकते. किंवा जेवण्यासाठी अनिच्छा होऊ शकते. 
 
2 कच्चं लसूण - जर आपणास सांधे दुखण्याचा त्रास आहे, तर आपल्याला आपल्या आहारात कच्चं लसूण समाविष्ट करावे. याचा सेवनाने आपली प्रतिकारक शक्ती वाढते. या मध्ये अ‍ॅलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ए आणि इ मुबलक प्रमाणात आढळतात.
 
3 दही - बऱ्याच लोकांना दूध पचत नाही किंवा दूध प्यायल्याने त्याचे दुष्परिणाम दिसून येतात पण दही एक अशे खाद्य पदार्थ आहे, जे सर्व लोकांसाठी फायदेशीर आहे. जर आपल्याला ओटीपोटात जळजळ होण्याचा त्रास आहे. तर आपण दह्याचे सेवन करू शकता. दह्याच्या सेवनाने प्रतिकारक क्षमता वाढते. तसेच हे पाचक प्रणालीला चांगले ठेवण्यास उपयुक्त आहे.
 
4 ओट्स - जर आपल्या कडे न्याहारी बनविण्यासाठी वेळ नाही, तर आपल्या घरात ओट्सचे पाकीट आणून ठेवा. हे खाल्ल्याने आपले वजनच कमी होणार नाही तर या मध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच या मध्ये अँटीमाइक्रोबियल चे गुणधर्म देखील असतात. दररोज ओट्सचे सेवन केल्याने आपली प्रतिकारक शक्ती बळकट होते.
 
5 व्हिटॅमिन सी - संसर्गजन्य रोगांपासून संरक्षणासाठी व्हिटॅमिन सी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. लिंबू आणि आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं, जे रोग प्रतिकारक क्षमतेला चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. या शिवाय आपण संत्री, मोसंबी, चवळी, कोबी, कोथिंबीर आणि पालक आपल्या आहारात समाविष्ट करू शकता.
 
6 अंजीर - अंजीर पोटॅशियम, मॅगनीज आणि अँटी ऑक्सीडेन्ट घटकाने समृद्ध असतात. हे शरीराच्या पीएच पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. या मध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. 
 
7 अळशी किंवा जवस - अशे बरेचशे लोक आहे ज्यांना अळशी बद्दल काहीच माहिती नाही. त्याच वेळी, याचा बद्दल जास्त बोलले जात नसल्याने याला कमी आलेखले आहेत. तर अळशी मध्ये ओमेगा-3 आणि फॅटी अ‍ॅसिड आढळते. शाकाहारी असणाऱ्यांना ओमेगा -3 आणि फॅटी अ‍ॅसिड हे चांगले स्रोत आहे.
 
8 मशरूम - मशरूमचा वापर अनेक स्नॅक्स मध्ये करतात. मशरूम खाल्ल्याने आपली रोग प्रतिकारक शक्तीच बळकट होत नाही तर हे पांढऱ्या रक्त पेशींचे कार्य वाढवून शरीराच्या प्रतिकारक शक्तीला वाढवतं. कर्क रोगापासून संरक्षणासाठी देखील मशरूमचा वापर केला जातो. 
 
9 गाजर - गाजराचे काम शरीरात रक्त वाढविण्यासाठी असत त्याच सह हे बरेच हानिकारक बॅक्टेरियाशी लढतात. गाजर व्हिटॅमिन ए, कॅरोटिनाइड आणि अँटी ऑक्सीडेन्ट चे स्रोत आहे. गाजराच्या सेवनाने फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. मोतीबिंद झाले असल्यास आणि डोळ्याच्या आजारांना टाळण्यासाठी नियमितपणे गाजराचे सेवन करावे.
 
10 टॉमेटो - टॉमेटो हे एक अशे फळ आहे, जे बहुतेक भारतीय डिश मध्ये वापरतात म्हणून हा प्रत्येक घरात सहजपणे आढळतो. टॉमेटो एलडीएल (बॅड कोलेस्ट्राल) ची पातळी कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. या मध्ये लायकोपिन असत, जे शरीरातील मुक्त असलेल्या रॅडिकल्स ला न्यूट्रलाइझ करतं, या मुळे फ्री किंवा मुक्त असलेले रॅडिकल्स आपल्या शरीरास काही हानी पोहोचवू शकत नाही.