रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (17:49 IST)

लासा तापाची लक्षणे आणि प्रतिबंधक उपाय जाणून घेऊ या

कोरोनाने आधीच देशात दहशत निर्माण केली आहे. त्याचवेळी, कोरोनाच्या नवीन प्रकारांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, आता जगासमोर आणखी एक व्हायरस आला आहे, ज्याचे नाव आहे लासा व्हायरस . आरोग्य अधिकार्‍यांनी आधीच इशारा दिला आहे की हा विषाणू साथीचे रूप देखील घेऊ शकतो. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विशेषत: प्रवास करणाऱ्यांनी या आजाराची लक्षणे काय आहेत हे जाणून घेतले पाहिजे . तसेच, हा आजार कसा टाळता येईल जाणून घ्या.

लासा विषाणूमुळे माणसाला लासा ताप येतो .हा एक गंभीर हीमोरेजिक रोग आहे .ते उद्भवते. हा विषाणू एरेनावाइरस(Arenavirus )कुटुंबातील आहे. त्याची सुरुवातीची लक्षणे लोकांना दिसत नाहीत. जरी ही एक धोकादायक समस्या आहे, परंतु त्याची लक्षणे लक्षात घेणे आवश्यक आहे. हा संसर्ग उंदरांद्वारे होतो. जर एखादी व्यक्ती उंदराची विष्ठा, मूत्र किंवा त्यांच्या दूषित अन्नाच्या संपर्कात आली तर लासा विषाणूची समस्या असू शकते. याशिवाय, जर एखादी व्यक्ती संक्रमित व्यक्तीच्या द्रवाच्या संपर्कात आली तर ही समस्या उद्भवू शकते.मात्र, हा विषाणू करोनाप्रमाणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही.या विषाणूची कोणतीही लस अद्याप अस्तित्वात नाही, परंतु रिबाविरिन हे अँटीव्हायरल औषध व्यक्तीला दिले जाते.
 
लासा तापाची लक्षणे
1 व्यक्तीचे फुफ्फुसात पाणी भरते.
2 घसादुखीची समस्या.
3 डायरियाची समस्या होणे 
4 मळमळ किंवा उलट्या होणे.
5 चेहऱ्यावर सूज येणे.
6 आतड्यांमध्ये रक्ताची समस्या होणे.
7 योनीतून रक्तस्त्राव होणे 
8 कमी रक्तदाबाची समस्या असणे.
9 धाप लागणे.
10 अंगात थरकाप उडतो.
11 व्यक्तीच्या ऐकण्याची क्षमता प्रभावित होणे .
12 मेंदूला सूज येणे.
लासा  तापाच्या गंभीर लक्षणांबद्दल बोलावं तर, रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा तो दगावू शकतो.
 
लासा तापाचा प्रतिबंध
लासा ताप खालील प्रकारे टाळता येतो-
 
1 उंदराची विष्ठा आणि लघवी किंवा त्याच्या दूषित अन्नापासून दूर राहावे.
2 घरात उंदरांना प्रवेश देऊ नका.
3 अन्न खाण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा.
4 अन्न झाकून ठेवा.
5 जेवण्यापूर्वी प्लेट नीट धुवा.
6 कच्चे अन्न खाणे टाळा.
7 शिजवल्यानंतरच खा.
8 आपले घर नीटनेटके आणि स्वच्छ ठेवा.