शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (17:24 IST)

Diabetes रुग्ण भोपळ्याची भाजी खाऊ शकतात का? जाणून घ्या

मधुमेह हा असा आजार आहे, ज्यानंतर व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे बदलते. यामध्ये रुग्णाला केवळ आयुष्यभर औषधेच घ्यावी लागत नाही, तर त्याला त्याच्या खाण्यापिण्यातही बरेच बदल करावे लागतात. या स्थितीत भोपळ्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे की नाही हे जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला अंध बनवू शकतो आणि हृदयविकाराचा झटका देखील आणू शकतो. अशा परिस्थितीत, भोपळ्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णासाठी योग्य आहे की नाही हे जाणून घ्या - 
 
भोपळा पोषक - भोपळा कमी कॅलरीयुक्त अन्न आहे. ज्यात  अनेक पोषक घटक आढळतात. त्याच वेळी, हे पोषक आपल्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायबर हा उत्तम पदार्थ आहे. ज्याद्वारे तुम्ही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकता.
 
भोपळ्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम - भोपळा ही एक भाजी आहे ज्यामध्ये ग्लायसेमिक लोड खूप कमी असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही भोपळ्याचे जास्त सेवन केले तर ते तुमच्या साखरेची पातळी स्पाइक करु शकतं. पण जर तुम्ही त्याची सर्विंग्स खूप मर्यादित ठेवली तर त्याचा तुमच्या शुगर लेव्हलवर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी भोपळ्याचे सेवन अत्यंत मर्यादित प्रमाणात करावे.
 
मधुमेहामध्ये भोपळ्याचे फायदे - मधुमेहाच्या रुग्णासाठी भोपळा फायदेशीर ठरू शकतो. भोपळ्याच्या आत दोन संयुगे असतात, त्यापैकी एक ट्रायगोलाइन आहे आणि दुसरे निकोटिनिक अॅसिड आहे. हे दोन्ही मधुमेहाचे परिणाम कमी करू शकतात. त्याचबरोबर अनेक लोक भोपळ्याचे भाकरी, भोपळ्याचा रस अशा वेगवेगळ्या प्रकारे भोपळ्याचे सेवन करतात, पण हे सर्व भोपळ्याच्या भाजीइतके फायदेशीर नाहीत.