शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (16:23 IST)

नॉनव्हेज न खाता या गोष्टी खाऊन देखील वजन वाढवू शकता,जाणून घ्या

लोक आपले वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात, पण ज्या प्रमाणे बरेच लोक वजन कमी करण्याबद्दल चिंतित असतात, त्याचप्रमाणे ते वजन वाढवण्याबाबतही चिंतित असतात. असे बरेच लोक आहेत ज्यांना आहार चांगला असतो तरी पण  त्यांचे वजन वाढत नाही. अशा परिस्थितीत आपल्यालाला ही वजन वाढवायचे असेल तर काही गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा.
 
1 दूध-केळी- दूध आणि केळी वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. केळीमध्ये भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. दुधात मिसळून केळी खाल्ल्याने प्रोटीन सप्लिमेंट सारखाच परिणाम होतो.
 
2 दूध-बदाम -आहारात दूध आणि बदाम यांचा समावेश केल्याने आपले वजन झपाट्याने वाढते.  4-5 बदाम रात्रभर पाण्यात भिजवावे आणि सकाळी ते बारीक करून ते दुधात मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे जलद वजन वाढू शकते.
 
3 चणा आणि खजूर - हरभरा आणि खजूर दोन्ही खाल्ल्याने वजन वाढते. या दोन्ही गोष्टी आपण  दिवसातून दोनदा सेवन केल्या पाहिजेत. दोन्हीमध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. हरभरा आणि खजूर एकत्र खाल्ल्याने वजन वाढवता येते.
 
4 लोणी आणि ड्रायफ्रूट्स -लोणी आणि ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने वजनही वाढते. जर आपल्याला   सुका मेवा सहज पचत नसेल तर आपण सुका मेवा भाजून खाऊ शकता. भाजताना त्यात बटर घाला. जेवण करताना ते मधून मधून खाणे सुरू ठेवा.