शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

या 5 वस्तू करतील आपले दात खराब

ब्लॅक कॉफी
जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने करत असाल तर ही आपल्या स्वच्छ दातांवर डाग लावण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका निभावेल. शक्य असल्यास ब्लॅक कॉफीचे सेवन कमी करावे आणि काही मात्रेत दूध टाकून प्यावे.
रेड वाइन
रेड वाइन आपल्या हृदयासाठी फायदेशीर आहे परंतू दातांसाठी मुळीच नाही. ही आपल्या पांढर्‍या स्मितला कमी करू शकतं.

डार्क सोडा
डार्क सोडा दातांसाठी नेहमीच नुकसानदायक असतं, कारण यात कृत्रिम रंग मिसळलेला असतो. ज्या तापमानावर आपण याचे सेवन करता, तेही दातांना प्रभावित करतं.
 
ब्लूबेरी
ब्लूबेरी अँटी ऑक्सीडेंटने भरपूर असते, परंतू ही आपल्या दातांवर निळ्या रंगाचे डाग सोडते. तसेच क्रॅनबेरी ज्यूस पिण्याची सवयही दातांसाठी नुकसानदायक आहे.
 
सोया सॉस
चायनीज फूडमध्ये वापरण्यात येणारा सोया सॉसने दातांचा पांढरेपणा गमावला जातो. यात सोडियमची मात्रा अधिक असल्यामुळे हे नुकसानदायक आहे.