शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (09:22 IST)

हिवाळ्यात दात दुखी का होते, जाणून घ्या

दातांना थंड-गरम लागणे ही सामान्य बाब आहे, जी बऱ्याच लोकांमध्ये आढळते. पण थंडीच्या हवामानात हा त्रास वाढतो आणि तोंड धुताना पाणी तोंडात घेतल्यावर थंडपाणी दातांना लागल्यावर दातदुखी सुरू होतं. याचा संबंध दातांच्या संवेदनशीलतेशी आहे. जर आपले दात कमकुवत होतात किंवा त्यांच्यामध्ये काही त्रास उद्भवतात, तेव्हा दातांना धरून ठेवणाऱ्या पेशी कमकुवत होऊ लागतात आणि त्यांची संवेदनशीलता वाढते. पण थंडीच्या हवामानात संवेदनशीलता वाढते. अखेर का आणि कसा हा त्रास उद्भवतो आणि दातांना थंड गरम लागण्याचे इतर कारणे देखील आहे. हे जाणून घेऊ या.
 
दातांची संवेदनशीलता वाढणे आणि वेदना होणं, खरं तर या दातांवरील थर म्हणजे संरक्षक कवचाला इजा होणं याचा परिणाम आहे. जे दातांसाठी एका स्वेटर प्रमाणे काम करत. हे एनॅमल ला खराब होण्यापासून वाचवत, ज्यामुळे दात सुरक्षित राहतात.तसेच अम्लीय पदार्थांचा वापर जसे की सोडा आणि कोल्डड्रिंकच्या वापरामुळे एनॅमलला इजा होते आणि दातांचे हे संरक्षक कवच तुटते.
 
पचनाशी निगडित त्रास आणि ऍसिडिटी देखील दातांमध्ये थंड -गरम लागण्याला कारणीभूत आहे. खरं तर, ऍसिडिटी झाल्यावर पोटातील अम्ल आंबट पाण्याच्या रूपात तोंडात येतं आणि दाताच्या बाहेरील भागात असलेल्या कॅल्शियमचा थर अम्लाच्या संपर्कात येऊन वितळू लागतो. ही परिस्थिती वाढल्यावर दातांचे संरक्षक कवच गळून पडतात. त्यामुळे दातांची संवेदनशीलता वाढते आणि दातांमध्ये थंड-गरम लागण्याची समस्या उद्भवते.  
 
दातांच्या संरक्षक थराला इनैमल म्हणतात आणि आतील थराला डेंटीन म्हणतात. या आतील भागाचा थर गळून पडल्यावर पल्प किंवा लगदा बनतो आणि आंतरिक मज्जा तंतूंच्या संपर्कात येऊन दातांचे दुखणे सुरू होतं.
 
संरक्षक कवचात खळगा पडणे -
1 च्युईंगम चावत राहणे, पेंसिल दाताने चावणे सारख्या सवयी दाताच्या इनैमलला खराब करतात. या मुळे इनैमल ला थंड गरम लागणे जाणवतं.
 
2 लिंबू आणि संत्र्याचा रस देखील दातांच्या इनैमलला इजा पोहोचवतो, पण जास्त नाही. 

3 सुपारी खाण्याच्या सवयीमुळे देखील दात घासले जातात. बरेच लोक असे आहेत जे दिवसभर सुपारी चावतात या मुळे इनैमल खराब होतं जास्त पान खाणारे देखील पान खाणे तेव्हा सोडतात जेव्हा त्यांच्या दाताला थंड जाणवतं.
 
4 पानासह सुपारी चावल्याने त्यांचे नर्व्ह बाहेर पडतात पण काथ्याची थर पाण्यापासून नर्व्हला वाचवते. पान खाणे झाल्यावर पाणी थेट नर्व्हच्या संपर्कात येतं. काही लोकांना झोपेत दात चावायची सवय असते या मुळे देखील इनैमल खराब होतं. 
 
5 अधिक प्रमाणात अम्लीय पदार्थांचे सेवन, अधिक थंड-गरम पदार्थांचे सेवन, चहा, कॉफी, सिगारेट, तंबाखू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन दातांच्या संरक्षक थराला खराब करत.
 
उपाय - 
विशेष टूथपेस्ट : संवेदनशील दातांसाठी विशेष टूथपेस्ट उपलब्ध आहे. 
सामान्य टूथपेस्ट ऐवजी या पेस्टचा वापर करावा. व्हाइटनर असलेल्या टूथपेस्टचा वापर करू नका, हे दातांवर कठोरपणे काम करतं. या मुळे त्रास वाढतो.
 
टूथब्रश मऊ असावा -
मऊ किंवा अतिरिक्त मऊ असलेले ब्रशचा वापर करावा. कडक ब्रिसल्समुळे दात घासले जातात. दात संवेदनशील झाल्यामुळे ब्रश करताना लोकांना दातात वेदना होते. कडक ब्रिसल्स नैसर्गिक दृष्टया दुरुस्ती मध्ये अडथळे आणतात. दातांवर हळुवार वर-खाली अशा पद्धतीने ब्रश करा. ब्रश करण्याची चुकीची पद्दत देखील संवेदनशीलता वाढवते.