मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (16:17 IST)

रात्री काय खावे?

रात्री झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवावे, असा सल्ला नेहमीच दिला जातो. मात्र काम किंवा इतर कारणामुळे होणारे जागरण, लवकर जेवणे यामुळे रात्री उशिरा भूक लागू शकते. अशावेळी वेफर्स, चॉकलेट्‌स, आईस्क्रीमसारखे अनारोग्यदायी पदार्थ खाल्ले जातात. मात्र, रात्री भूक लागल्यानंतर खाता येणारे काही आरोग्यदायी पदार्थही आहेत. अशा पदार्थामुळे तुमच्या कॅलरीही वाढणार नाहीत आणि रात्री त्रासही होणार नाही. कोणते आहेत हे पदार्थ? जाणून घेऊ.
 
विविध प्रकारच्या बिया आणि सुका मेवा हे मिश्रण खाता येईल. यात भरपूर पोषणमूल्य असतात. मात्र, हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खायला हवेत. रात्रीच्यावेळी उकडलेले अंडंही चालून जाईल. एका मध्यम आकाराच्या उकडलेल्या अंड्यात फक्त 78 कॅलरी असतात. तसेच अंडी हा प्रथिनांचाही स्रोत आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंडी खाता येईल.
 
फायबरयुक्त ओट्‌समुळे पोट बराच काळ भरलेले राहाते. यातल्या पोषणमूल्यांमुळे तुम्हाला छान झोपही लागेल. वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही पॉपकॉर्नही खाऊ शकता.
वैष्णवी कुलकर्णी