शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

आरोग्य आणि संपत्तीचा परस्परांशी घनिष्ठ संबंध?

WD
आरोग्य धनसंपदा हे सुभाषित लहानपणापासूनच आपल्या मनावर बिंबवण्यात येते. या सुभाषितातून आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे आपल्या ऋषिमुनींनी सांगून ठेवले आहे. हे खरे असले तरी आरोग्याच्या संपत्तीशी घनिष्ठ संबंध असतो असेही दिसून आले आहे. आरोग्याबाबत गुगलवर मोठय़ा प्रमाणात सर्च करण्यात आलेल माहितीच्या आधारे केलेल्या संशोधनाद्वारे हा निष्कर्ष काढला आहे.

नुकत्याच आलेल्या मंदीच्या काळात लोकांनी मोठय़ा प्रमाणात गुगलवर आरोग्याशी संबंधित माहिती सर्च करून आपल्या आजाराबाबत प्रश्न विचारल्याचे दिसून आले. यामध्ये जीवघेण आजारांचा समावेश नसला तरी अल्सर, डोकेदुखी, पाठदुखी यासारख्या आजारांबाबत माहिती शोधण्यात आली. ही माहिती शोधण्याचा आकडा हा जवळपास 20 कोटींपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. यातूनच मंदीच्या काळात लोक मोठय़ा प्रमाणावर आजारी होते. त्यामुळे उपचार शोधण्यासाठी सर्च केले असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे सॅन दिएगो स्टेट युनिव्हर्सिटीचे जॉन डब्लू आर्स यांनी सांगितले.

आर्स आणि बेंजामिन यांचे सहकारी गेल्या अनेक दिवसांपासून छातीत दुखणे, डोकेदुखी, हृदविकार, वेदना, पोटदुखी यासारख्या सर्वसामान्य आजारांबाबत संशोधन करत आहेत. त्यासाठी गुगलवर सर्च केलेल्या माहितीचा त्यांनी वापर केला. या माहितीमध्ये पोटातील अल्सरच्या लक्षणांवर अपेक्षेपेक्षा 228 टक्के तर डोकेदुखीच्या लक्षणांवर अपेक्षेपेक्षा 193 टक्के जास्त लोकांनी सर्च केल्याचे दिसून आले. डोकेदुखीसंदर्भात 41 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी गुगलवर प्रश्न विचारल्याचेही दिसून आले. हर्निया 37 टक्के, छातीतील दुखणे 35 टक्के, हृदासंदर्भातील 32 टक्के लोकांनी प्रश्न विचारले. या संशोधनामध्ये पाठदुखी, सांधेदुखी, दातदुखी या आजारांबाबतही मोठय़ा प्रमाणात शोधण्यात आल्याचे समोर आले.