शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जून 2014 (15:20 IST)

खिशात मोबाइल बाळगत असाल तर, सावधान!

मोबाइल आजच्या काळातील सर्वाची एक गरज. पण, जर तुम्ही तुमचा मोबाइल पँटच्या खिशात ठेवत असाल तर सावधान! कारण मोबाइल पँटच्या खिशात घेऊन फिरणं तुमच्या पौरुषत्वावर विपरीत परिणाम  करू शकतं.

एक्स्टर विद्यापीठाच्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. मोबाइल फोन बाळगणं एकेकाळी स्टेटस सिम्बॉल होता, पण आता ती काळानुरुप गरज बनली आहे. पण नवनव्या संशोधनांनुसार मोबाइल फोन वापराचे काही धोकेही पुढे येऊ लागले आहेत. असाच एक धोका आता तुम्ही मोबाइल कुठे ठेवता यावरुनही समोर आला आहे. तुम्ही जर पँटच्या खिशात तुमचा मोबाइल ठेवत असाल तर, तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. मोबाइल फोनचा वाढता वापर आणि त्यामुळं होणार्‍या दुष्परिणामांसंबंधी जगभरात सातत्याने संशोधन सुरू आहे.

आता तुम्ही जर मोबाइल फोन पँटच्या खिशात घेऊन फिरत असाल तर ही सवय तुम्हाला घातक ठरू शकते. पँटच्या खिशात मोबाइल फोन ठेवणार्‍या पुरुषांमधील पौरुषत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो असं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे. फोनमधील किरणत्सोर्गामुळं विर्याच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.

एक्सटर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका पाहणीत, इलेक्ट्रोमॅगग्नेटिक रेडियशनमुळं विर्याची गती 8 टक्क्यांनी कमी झाल्याचं आढळून आलं आहे. शास्त्रज्ञांच्या टीमने 1492 पुरुषांचा सहभाग असलेल्या दहा अभ्यासांच्या पाहणीचे पुनर्परीक्षण केलं. मात्र फर्टिलिटी क्षेत्रातील तज्ज्ञाने या अभ्यासातील निरीक्षणाशी असहमती दर्शवत आपण आपला आयफोन पँटच्या खिशातच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. पुरुषाच्या पौरुषत्वावर मोबाइल फोनचा लक्षणीय प्रभाव पडतो असं शास्त्रज्ञांचे मत आहे. पँटच्या खिशात मोबाइल फोन बाळगणार्‍यांना किरणोत्सर्गाचा धोका संभवतो आणि त्यामुळं अशा मोबाइलधारकाची पिता होण्याची शक्यता कमी होते. जगभरातील बहुतांश व्यक्ती मोबाइल फोनचा वापर करतात आणि श्रीमंत देशातील जवळपास 14 टक्के जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो.