शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

फीट आल्यास काय कराल?

ND
ND
एकदम चिडणे, अचानक दबाव अथवा स्नायुंवर पडलेल्या दबावामुळे मिरगा किंवा फीट येऊ शकतो. अशा अवस्थेत रुग्णाचा श्वासोश्वास थांबण्याची ‍भीती असते. श्वास थांबला म्हणजे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होत असतो. अशा वेळी, कुठलाच विलंब न करता डाँक्टरांकडे धाव घ्यावी.

फीट येण्याची लक्षणे-
* स्नायु एकदम घट्ट आणि कडक होतात, व नंतर झटके येऊ लागतात.
* दातखिळी बसणे अथवा श्वास थांबण्याची शक्यता असते.
* तोंड अथवा ओठ निळे पडणे.
* अचानक चक्कर येऊन रुग्ण जमिनीवर कोसळतो व त्याच्या तोंडातुन फेस येवु लागतो.

उपचार कसा करल?
सर्वात आधी रुग्णाजवळच्या सगळ्या वस्तु दुर करा. त्याच्या डोक्याखाली काहीतरी मऊ द्या. रुग्णाच्या तोंडात किंवा दातात काहीही अडकवु नका. रुग्णाला काहीही प्यायला देऊ नका. रुग्णाने श्वास घेणे थांबविले तर, त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा व त्याचा श्वसन मार्ग ऊघडण्याचा प्रयत्न करा. बहुतेक फिट ही थांबुन थांबुन परत परत येते किंवा नंतर बेशुद्धावस्था येते. त्यामुळे रुग्णाला तात्काळ रुग्णालयात हलवा.