शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

मेनिनजाइटिस संक्रमणापासून वाचण्याचे उपाय

वॅक्सीनेशन
वयाच्या 16 ते 21 वर्षांच्या दरम्यान मेनिनजाइटिस संक्रमण पसरण्याचा धोका अधिक असतो. म्हणूनच या दरम्यान याचे वॅक्सीनेशन करणे आवश्यक आहे.


वैयक्तिक वस्तू वापरू नये
संक्रमित असलेल्या रूग्णाच्या वैयक्तिक वस्तू वापरण्याने संक्रमण पसरण्याची भीती असते. म्हणून संसर्ग झालेल्या व्यक्तीद्वारे वापरण्यात येत असलेला ग्लास, बॉटल, कप, ब्रश, लिपस्टिक किंवा लिपग्लॉस वापरू नये.


प्रतिकारशक्ती वाढवा
कोणते ही इन्फेक्शन झाल्यावर शरीरातील रोग प्रतिकारशक्ती प्रणाली त्याबरोबर लढण्यास तयार असते म्हणून इम्यूनिटी सिस्टम हेल्थी असल्यास या संक्रमणापासून रक्षण होऊ शकतं. ताजे फळं आणि भाजी-पाला आपल्या आहारात सामील करून आपले इम्यूनिटी सिस्टम बूस्ट केले पाहिजे.


डॉक्टरचा सल्ला
जर आपण एखाद्या अश्या व्यक्तीच्या संपर्कात आला असला जो या संसर्गाने ग्रस्त असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्या. तसे व्हायरलपासून वाचणे कठिण असते तरी सतत डॉक्टरचा सल्ला घेऊन ऍंटिबॉयोटिक्स किंवा इतर पर्याय शोधू शकता.


3 फुटाचा अंतर
जर आपण संक्रमित व्यक्तीच्या बरोबर आहात तर त्याच्याशी 3 फुटाचा अंतर ठेवा. याव्यतिरिक्त संक्रमित रूग्णाने शिंकरताना आणि खोकताना रुमाल वापरावा.


स्वच्छ हात धुवावे
हातांची स्वच्छता आपल्या या संक्रमणापासून वाचवू शकते. मुख्यतः वाशरूम वापरल्यानंतर, डायपर बदल्यानंतर आणि गर्दीतून आल्यावर कोमट पाणी आणि साबणाने हात स्वच्छ धुवावे.