शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

कोथिंबीरही गुणकारी

स्वयंपाकघरात कोथिंबिरीचा उपयोग होणार नाही असा एकही दिवस सापडणार नाही. अशा कोथिंबिरीचे औषधी गुणही बरेच आहेत.
 
कोथिंबीर शरीराचा दाह शमवणारी तसेच तृष्णाशामक आहे. भूकवर्धक आणि अतिसाराला मारक अशी कोथिंबीर डोळ्यांसाठीही अतिशय गुणकारी आहे. जळजळ होत असल्यास कोथिंबिरीचा एक किंवा दोन थेंब ताजा रस डोळ्यांमध्ये टाकल्याने आराम मिळतो.
 
ओल्या कोथिंबिरीबरोबरच धणेही तेवढेच उपयोगी आहेत. धणे व सुंठ समप्रमाणात घेऊन काढा करून प्यायल्याने खोकला हळूहळू कमी होऊन नाहीसा होतो. अतिसारावरही धण्याचा काढा करून प्यायल्याने उपयोग होतो.
 
गर्भवती स्त्रियांना उलट्यांचा अधिक त्रास होतो तेव्हा १0 ग्रॅम खडीसाखर आणि २.५ ग्रॅम धणे पावडर तांदळाच्या पेजमध्ये मिसळून दिल्यास उलट्या कमी होण्यास मदत होते.

धणे मुखशुद्धीकारकही आहेत. पचनादी त्रास झाल्यास किंवा अजिर्णामुळे हैराण झाल्यास चहाच्या पावडरबरोबर धणे पूड वापरतात.