‘हर्बल टी’चे अतिरेक सेवन टाळा …
सध्या जिम करणारे, डायटिंग करणारे, तसेच ज्यांनी चहा सोडला ते हर्बल टी ला जास्त महत्त्व देताना दिसत आहेत. पण हर्बल टी वाटते तेवढी सुरक्षित नाही. त्याचा जास्त उपयोग हा घातक ठरू शकतो. दिवसांतून एक- दोनदा ही टी घेतल्याने त्याचा परिणाम होत नाही. मात्र जर दिवसभरात आपण त्याचा जास्त सेवन करत असाल तर ते मात्र तुमच्या आरोग्यासाठी परिणामकारक ठरू शकते.
अनेक आजराला आपण बळी पडू शकतो. उदाहरण द्यायचे झाल्यास उलटी तीव्र डोकेदुखी, निद्रानाश, डायरिया, चिडचिडेपणा, हृदयाचे ठोके जलदगतीने पडणे, हातापायात कंप, चक्कर येणे, कानांमध्ये आवाज येणे, अशी अनेक प्रकारची लक्षण जाणवतात.
त्याचप्रमाणे ग्रीन टी सुद्धा घातक ठरू शकते. ग्रीन टी मुळे अँसिडची मात्रा वाढते. तसेच मळमळ, पोटदुखी असे आजारही उद्भवतात.
दोन कप ग्रीन टी मध्ये ग्रॅम कॅफन असते.
ग्रीन टी मधील रसायने गर्भावस्थेत घातक ठरू शकतात. म्हणूनच या महिलांनी दिवसातून दोन कपापेक्षा अधिक ग्रीन टी घेऊ नये. यामुळे गर्भपाताचा धोका संभवतो.