गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 20 डिसेंबर 2017 (11:38 IST)

"समाधान श्रीमंतीचं दुसरं नावं "

"श्रीमंती"
व्याख्याच वेगळ्या आहेत श्रीमंतीच्या.
घरात रोज ताजी फळं  / फुलं असणं म्हणजे श्रीमंती. 
आज अवचित पाहुणा दारात आला आणी त्याला पोटभर जेवू घालू शकलो तर ही श्रीमंती. 
आठवण आली म्हणून एखाद्या मित्राचा, नातेवाईकाचा फोन आला तर ही श्रीमंती. 
कुणीतरी अडचणीत आहे, मदतीसाठी आठवण आली तर हि श्रीमंती 
कुणाचे तरी विश्वास पात्र असणे म्हणजे श्रीमंती.
भर उन्हात फुललेला गुलमोहोर दिसावा म्हणजे नजरेची श्रीमंती. 
थंडीत मस्त फुले आंगण भर पडावीत तर कधी पारिजातकाचा सडा पडावा आणी त्याच्या सुगंधानें अंगण भरून जावं ही श्रीमंती.
होय आज अशीच श्रीमंती हवी आहे. 
अशी श्रीमंती आपल्या सर्वांना लाभावी. 
असे अनेक क्षण आपल्या आयुष्यात यावेत आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते जगता यावेत.  
आपल्या आसपास भरपूर माणसं असावीत आणी आपण खरंच श्रीमंत व्हावे...
अशाच शुभेच्छांसह.....
 सुप़भात