अकबर बिरबल कथा- अखेर बिरबलाने चोर पकडला

Last Modified रविवार, 24 जानेवारी 2021 (15:00 IST)
एकदा एक व्यापारी व्यवसायाच्या कामाने काही दिवसांसाठी राज्यातून बाहेर गेला होता. काम संपवून घरी आल्यावर तो बघतो की त्याच्या घरातील तिजोरी उघडी आहे आणि त्या मधील सर्व पैसे आणि दागिने चोरीला गेले आहे. तो
घाबरतो आणि घरातील सर्व नोकरांना बोलावतो. त्याच्या घरात एकूण 5 नोकर असतात. तो सर्व नोकरांना कडक शब्दात विचारतो की ''तुम्ही सर्व घरात असताना चोरी कशी झाली ? चोरी झाली तेव्हा तुम्ही सगळे कुठे होता '' ?
एक नोकर म्हणतो 'मालक माहीत नाही ही चोरी कधी झाली आम्ही
सगळे झोपलो होतो ''. त्याचे असे बोलणे ऐकून त्या व्यापाराला खूप राग आला आणि तो संतापून म्हणाला ''की मला तर वाटत आहे तुम्हा 5 पैकीच कोणी तरी चोरी केली आहे. आता मी तुमची तक्रार बादशहा अकबर कडेच करतो तेच तुम्हा सर्वांकडे बघतील''.असं म्हणत तो महालात जाण्यासाठी निघाला.


तो महालात पोहोचला तेव्हा बादशहा अकबर दरबारात लोकांच्या समस्यांना ऐकत होते.त्याने देखील बादशहाला म्हटले की हुजूर माझी देखील एक समस्या आहे मला आपण न्याय मिळवून द्या माझ्या समस्येला
देखील सोडवा. ''
बादशहा ने त्याला विचारले की आपण कोण आहात आणि आपली समस्या काय आहे''?
तो म्हणाला की हुजूर मी आपल्याच राज्यात राहणारा एक व्यापारी आहे. मी व्यवसाया निमित्त बाहेर गेलो होतो. परत आल्यावर बघतो तर माझ्या घरात चोरी झालेली होती. माझ्या तिजोरीतील सर्व पैसे आणि दागिने चोरीला गेले.मी आता उद्ध्वस्त झालो. माजी मदत करा मला न्याय मिळवून द्या.

हे ऐकून बादशहाने त्याला काही प्रश्न विचारले जसे की किती पैसे होते किती सामान चोरीला गेलं, एखाद्यावर संशय आहे का? इत्यादी. सर्व ऐकल्यावर बादशहाने हे काम बिरबलाकडे सोपविले आणि म्हणाले की खरा चोर पकडण्यासाठी बिरबल मदत करतील.

दुसऱ्या दिवशी बिरबल व्यापाराकडे पोहोचले आणि त्यांनी सर्व नोकरांना बोलविले आणि विचारले की चोरी झाली त्या रात्री ते सर्व कुठे होते? सर्वांनी म्हटले की ते त्या व्यापाराच्या घरातच राहतात आणि घरातच झोपले होते.
बिरबलाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाले -'' आपल्याला अस्वस्थ होण्याची गरजच नाही. माझ्या कडे या 5 जादूच्या कांड्या आहे मी ह्या कांड्या सगळ्यांना देईन. जो चोर असेल, त्याची कांडी आज रात्री 2 इंच लांब होईल आणि चोर पकडला जाईल. उद्या आपण याच ठिकाणी भेटू ''
असं म्हणत बिरबलाने सर्वांच्या हातात एक एक कांडी दिली आणि तिथून चालले गेले.
दिवस सरला. दुसऱ्या दिवशी बिरबल व्यापाऱ्याकडे पोहोचले आणि त्यांनी सर्व नोकरांना कांडी घेऊन बोलविले. बिरबलाने सर्वांच्या कांड्या बघितल्यावर त्यांना एका नोकराची कांडी इतर कांड्या पेक्षा दोन इंच लहान झालेली दिसली.

त्यांनी लगेचच शिपायांना त्या चोराला पकडण्याचा आदेश दिला. व्यापारी घडणाऱ्या घटनेला बघून आश्चर्यात पडला आणि बिरबलाकडे बघू लागला. बिरबलाने व्यापारीला समजावले की ह्या काही जादूच्या कांड्या नसून साध्याच होत्या पण चोराला असे वाटले की ती कांडी दोन इंच मोठी होईल म्हणून त्याने ती कांडी तोडून दिली आणि तो पकडला गेला. व्यापारी बिरबलाच्या हुशारीने खूप प्रभावित झाला आणि त्यांचे आभार मानले.

धडा: वाईट करण्याच्या परिणाम नेहमी वाईटच असतो.यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या
एका जंगलात दोन शेळ्या राहत होत्या.त्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात गवत खात होत्या

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स
सध्या लोक आरोग्यासाठी जागरूक झाले आहेत, तळलेले पदार्थ खाणे टाळत आहे

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.
कोरफडाचे बरेच फायदे आहे, हे आरोग्यासह त्वचा, केस आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा
परीक्षा कोणतीही असो, समस्या सोडविण्याशिवाय बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ...

जागतिक महिला दिन विशेष 2021 : "महिलांचा सन्मान "

जागतिक महिला दिन विशेष 2021  :
आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष सन्मान आणि महत्त्व दिले आहे.