बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (09:09 IST)

भाजी बनवताना लक्षात ठेवा या 10 किचन टिप्स

*कोबी शिजवताना शुभ्र रंग कायम राखण्यासाठी त्यात जरासे व्हिनेगर घालावे.
*पालेभाज्या सुकत असल्यास पाण्यात १ चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचं रस घालून त्यात ठेवल्या तर ताज्या होतात.
*भरीतासाठी वांगी भाजण्यापूर्वी त्याला पुसट तेलाचा हात लावावा किंवा सुरीने छोटी चिर पाडावी. नंतर वांगी भाजून लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.
*पालक कच्चा मिक्सरमध्ये वाटून मग भाजी बनवल्यास हिरवा रंग कायम राहतो.
*हिरवी मिरची जास्त काळ टिकावी यासाठी मिरचीचे देठ काढून ठेवावी.
*कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये. अशाने बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.
*रस्सा भाजीत मीठ जास्त पडल्यावर त्यात उकडलेला बटाटा घालावा किंवा कणकेचा गोळा देखील घालू शकता.
*बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमूटभर हळद घालावी.
*भाज्यांमध्ये मीठ शेवटी घालावे. अशाने भाज्यांमधील लोह टिकण्यास मदत होते.
*भेंडीची भाजी शिजवताना त्यात आंबट घातल्याने ती चिकट होत नाही. आपण दही किंवा आमचूर पावडर घालू शकता.