गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (13:19 IST)

अस्सल केशर कसे ओळखावे? या प्रकारे खरा खात्री

केशर अस्सल आहे वा नाही हे ओळखण्यासाठी काही ट्रिक्स आहेत ते जाणून घ्या-
केशर एका प्रकाराचा मसाला आहे ज्यात अनेक औषधीय गुण असल्याने आरोग्यासंबंधी समस्या दूर होतात. यात एंटी-इंफ्लेमेटरी, एंटीअल्जाइमर, एंटीकॉनवल्सेन्ट आणि एंटीऑक्सीडेंट या सारखे गुण आढळतात. केशराचा वापर कफ बरा करण्यासाठी, हाजमा सुधरवण्यासाठील हिरड्यांची समस्या दूर करण्यासाठी करतात. लोक रात्री दुधात केशर मिसळून त्याचे सेवन करतात जे आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरतं. परंतु हल्ली बाजारात भेसळयुक्त केशर विकलं जाऊ लागलं आहे जे ओळखणे कठिण असतं. म्हणून आज आम्ही अशा काही ट्रिक्स सांगत आहोत ज्याने अस्सल केशर ओळखता येऊ शकतं- 
 
जेव्हा तुम्ही बाजारातून केशर आणाल तेव्हा ते पाण्यात टाकून बघा जर लगेच त्याचा रंग सुटला तर हे भेसळयुक्त असल्याचे लक्षण आहे, ते लगेच दुकानदाराला परत करा.
 
दुसरा मार्ग म्हणजे जेव्हाही तुम्ही केशर खरेदी करून आणाल तेव्हा ते तुमच्या जिभेवर ठेवा आणि पहा 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्हाला तुमच्या डोक्यात उष्णता जाणवू लागली तर समजून घ्या की तुम्ही अस्सल केशर आणले आहे.
 
केशर जिभेवर ठेवल्यावर चव गोड असेल आणि रंग जिभेवर सोडत असेल तर ते खोटे आहे हे समजून घ्या.
 
केशर ओळखण्यासाठी एका कपमध्ये थोडेसे पाणी आणि बेकिंग सोडा मिसळा, त्यात केशर घातल्यावर नारंगी रंग आला तर समजून घ्या की केशर नकली आहे. वास्तविक केशर पिवळा रंग सोडतो.
 
केशर हातात घेऊन दाबा, तुटल्यास अस्सल नाही तर केशर नकली आहे समजावे.
 
गरम पाण्यात आणि दुधात केशराचे तंतू विरघळत नसतील तर त्याचा अर्थ केशर नकली आहे. हे धागे इतके पातळ असतात की ते गरम होताच विरघळतात.
 
अस्वीकरण: ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान केली गेली आहे. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या.