शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (13:32 IST)

मेथीची भाजी बऱ्याच काळ ताजी ठेवण्यासाठी गजब टिप्स

हिवाळ्याच्या हंगामात बऱ्याच भाज्या बाजारपेठेत दिसू लागतात. या मध्ये हिरव्या पाले भाज्यांचा समावेश देखील असतो. बऱ्याच पाले भाज्या अशा असतात की ज्या खाण्यात तर चविष्ट असतात, आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. पण या भाज्या घरात आणल्यावर बराच काळ फ्रीज मध्ये ठेवून खराब होतात. 
 
विशेषतः मेथीची भाजी. यांचा हिरवागार रंग बदलतो आणि या पिवळ्या होऊ लागतात आणि त्याची चव देखील कडवट होते. पण असे बऱ्याच वेळा होते की, जेव्हा आपण बाजारपेठेतून भाज्या आणल्यावर त्याला लगेचच शिजवू शकत नाही आणि काही दिवस तरी त्यांना तसेच ठेवावं लागत. मेथीच्या भाजीसाठी देखील ही गोष्ट लागू होते. अशा परिस्थितीत मेथीला योग्यरित्या साठवून ठेवले तर 10-20 दिवस काय वर्षभर देखील चांगली राहील. त्याची रंग आणि चव देखील बदलणार नाही. 

चला तर मग आज आम्ही आपल्याला हे सांगत आहोत की आपण घरीच मेथीची भाजी साठवून कशी ठेवू शकता. तसेच बऱ्याच काळ हिरवीगार कशी ठेवू शकता.

* पेपर टॉवेल मध्ये साठवून ठेवा -
जर आपल्याला मेथीची भाजी 10 -12 दिवसांपर्यंत साठवून ठेवायची असल्यास, ती पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवणं चांगले राहील. या साठी आपल्याला मेथीची भाजी निवडून ठेवावी लागणार. लक्षात ठेवा की आपल्याला ही भाजी पाण्याने धुवायची नाही. आपल्याला ही भाजी वापरतानाचं धुवायची आहे. आता ही भाजी पेपरच्या टॉवेल मध्ये गुंडाळून ठेवावी. नंतर हे टॉवेल प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवा या पिशवीतून हवा पूर्णपणे काढून टाका. नंतर या पिशवीला हवाबंद डब्या मध्ये ठेवा. हा डबा आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता. आपल्याला जेवढी भाजी पाहिजे आपण तेवढी काढून पुन्हा भाजी तशीच पेपर टॉवेल मध्ये गुंडाळून ठेवू शकता. 
 
* फ्रीजर मध्ये ठेवावी-
जर आपण मेथीची भाजी वर्षभर साठवून ठेवण्याचे इच्छुक आहात ते आपल्याला यांना साठवून ठेवण्याची पद्धत देखील बदलावी लागेल. बऱ्याच काळ साठवून ठेवण्यासाठी आपल्याला या भाजीला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे लागणार. या मुळे मेथीची घाण निघून जाईल. आता मेथीची भाजी वाळवून घ्या. 
 
आपल्याला वर्षभर ही भाजी साठवून ठेवण्यासाठी त्यावरील कांड्या काढून निवडून घ्या. निवडलेली भाजी एका झिपलॉक प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवा आणि ही पिशवी बंद करून फ्रीजर मध्ये ठेवा. गरजेच्या वेळी त्या पिशवीतून भाजी काढा आणि नंतर पिशवी चांगल्या प्रकारे लॉक करून ठेवा.
 
* वाळवून ठेवणं -
मेथीची पाने वाळवून देखील बऱ्याच काळ साठवून ठेवता येऊ शकतात. पण या पद्धती मुळे मेथीच्या भाजीची चव बदलते पण खराब होत नाही. मेथीची पाने वाळविण्यासाठी त्यांना 3 ते 4 वेळा धुवून घ्या. जेणे करून पानांना लागलेली घाण निघून जाईल. या नंतर पाने वाळवून घ्या. या साठी आपण पानांना सूती कपड्यात बांधून वाळण्यासाठी उन्हात ठेवा. फक्त 2 दिवसातच ही पाने वाळून जातील. नंतर ही वाळकी पाने आपण एका हवाबंद डब्यात देखील ठेवू शकता. ही पाने आपण भाजी किंवा पराठे बनविण्यासाठी देखील करू शकता. पुढच्या वेळी आपण मेथीची भाजी साठवताना या टिप्स लक्षात ठेवा.