शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

डोसा क्रिस्पी बनविण्यासाठी...

* डोसा क्रिस्पी बनविण्यासाठी त्या पिठात थोडी साखर घालावी.





 

* पोळ्या नरम आवडत असल्यास आट्यात थोडं मीठ आणि तेल मिसळून कोमट पाण्याने मळावा. 15 मिनिटांनंतर पोळ्या कराव्या.

* रोज सकाळी भाजी चिरणे कठीण जात असल्यास रात्रीच भाजी चिरून एयर टाइट कंटेनर मध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवावी.

* बटाटे सोलून 15-20 मिनिटांसाठी गार पाण्यात टाकून ठेवावे. चिरून लगेच भाजी टाकावी. याने बटाटे लवकर शिजतात.

* व्हेजिटेबल बिर्याणी स्वादिष्ट बनविण्यासाठी त्यात तेलात जास्त परतलेला कांदा आणि टोमॅटो घालावे.

* घरी तयार केलेली आलं-लसूण-मिरची पेस्टला जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी त्यात एक चमचा गरम तेल आणि मीठ घालून ठेवावं.