testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मटण मेथी

mutton methi
वेबदुनिया|
साहित्य : अर्धा किलो मटण, २ वाटय़ा मेथीची भाजी, ४ मोठे कांदे (उभे चिरलेले), १ वाटी ओल्या खोबऱ्याची पेस्ट, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, २ मोठे बारीक चिरलेले टोमॅटो, २ चमचे लाल तिखट, १ चमचा धणे पावडर, २ मोठे चमचे तेल, १ चमचा गरम मसाला (लवंग, वेलची, दालचिनी), मीठ चवीनुसार.
कृती : एका कुकरमध्ये तेल गरम करणे. त्यात कांदे खरपूस तळून घेणे. धुतलेल्या मटणामध्ये हळद व मीठ लावणे. परतलेल्या कांद्यामध्ये मटण, टोमॅटो, बारीक चिरलेली मेथीची भाजी, टाकून पाच मिनिटे शिजवणे. नंतर आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, ओल्या टाकून मिश्रण चांगले परतणे. दोन वाटय़ा पाणी टाकून कुकरच्या सहा ते सात शिटय़ा करणे. गरम गरम सर्व करणे.


यावर अधिक वाचा :