शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

स्वादिष्ट बंगाली फिश

साहित्य - अर्धा किलो लहान आकारात हिल्सा जातीचे मासे, तीन ते चार चमचे हळदीची पुड, दोन मोठे चमचे मोहरी, सहा हिरव्या मिरच्या (तीन बारीक कापलेल्या व तीन अख्या) दोन चमचे दही, 100 ग्रॅम तेल व पुरेसे मीठ. 
 
कृती - सर्वप्रथम लहान आकारात आणलेले मासे मीठ व हळद लावून चांगल्या प्रकारे रगडा. तीन अख्या मिरच्या वर मोहरीची डाळ वाटून घ्या. त्यात दही मिक्स करून चांगल्या प्रकारे फेटा व तयार झालेले पेस्ट मीठ आणि हळद लावलेले मास्यांवर लावा. 
 
कुकरमधे तेल टाकून साधारण तीन मिनिटापर्यंत तापू द्या. नंतर त्यात कापलेली हिरवी मिरची, थोडा गरम मसाला व मासे टाका. कुकरवर छाकण ठेऊन साधारण 10 मिनिटांनंतर गॅस बंद करा. सर्व्ह करताना डिशमध्ये दोन मासे ठेऊन त्यावर चाट मसाला व कोथिंबीर बारीक कापून टाका. गरमा गरम 'बंगाली फिश'चा आस्वाद पाहूण्यासह तुम्ही घ्या.