शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

गर्भधारणेनंतर अनियमित पीरियड्सची समस्या

मुलं जन्माला आल्यावर महिलेत शारीरिक, मानसिक आणि मनोवैज्ञानिक बदल येणे स्वाभाविक आहे. शरीरात हार्मोनचे स्तर बदलत असतं ज्याचे अनेक लक्षण दिसून येत आहेत. अनियमित पीरियड्स यातून एक मोठी समस्या आहे. मेंदूत पिट्यूटरी ग्रंथी एफएसएच याचा स्त्राव करते आणि डिलेव्हरीनंतर प्रक्रिया अनियमित होते आणि प्रॉलॅक्टिन नामक हार्मोन शरीरात सरावीत होऊ लागतं ज्याने पीरियड्सचा चक्र बाधित होतं. या प्रकाराचे स्त्राव येणे-जाणे पुढील सहा आठवड्यापर्यंत चालू राहू शकतं. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते म्हणून असामान्य लक्षण दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
 
या दरम्यान कोणत्याही प्रकाराचे अस्वच्छ वस्तू वापरू नये कारण याने संक्रमणाचा धोका असतो. या दरम्यान टाइम टॅम्पून्स न वापरता कॉटनचे सेनेटरी नॅपकिन वापरायला हवे. नॅपकिन चार ते सहा तासाने बदलायला हवे.
 
तसेच हार्मोन असंतुलन, ओव्हेरियन सिस्ट, संक्रमण, ताण, कमजोरी, ट्यूमर आणि थायरॉईड हे अनियमिततेचे कारण असू शकतात म्हणून योग, मेडिटेशनचा सहारा घेणे योग्य ठरेल. तसेच डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये. ओरल पिल्स घेणे टाळावे. वजन नियंत्रित ठेवावे तसेच व्हिटॅमिन युक्त आहार घेतला पाहिजे.