प्रयत्न सुरू असून ही गर्भधारणा होत नसेल तर त्यामागे काही कारणं असू शकतात. यासाठी पुरूष आणि महिला दोघेही जबाबदार असू शकतात. अनेकदा यामागील समस्या स्थायी नसून उपचाराने गर्भधारणा केली जाऊ शकते. बघू या काय कारणं आहे यामागे:
लठ्ठपणा
लठ्ठपणामुळे पुरुषांची सक्रियता कमी होते आणि स्पर्म काउंट घटतं. तसेच महिलांच्या ओव्हरीमध्ये चरबी वाढल्याने एग्ज डेवलप होत नाही आणि गर्भधारणेत अडचण येते.
वय
पुरुषांमध्ये 35 ते 40 वयानंतर स्पर्म काउंट कमी व्हायला लागतं. तसेच महिलांमध्ये चाळिशीनंतर मेनोपॉज किंवा हॉर्मोनल समस्यांमुळे गर्भधारणेत समस्या उद्भवते.
इन्फेक्शन
पुरुषांमध्ये युरीन इन्फेक्शन, टीबी व इतर संक्रमणामुळे स्पर्म काउंट कमी होऊन जातं. तसेच महिलांमध्येही युरीन इन्फेक्शन, यूट्रसमध्ये टीबीमुळे फेलोपियन ट्यूब खराब होऊन जाते.