testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गुढीपाडवा स्पेशल : पुरणाच्या पोळीचा बेत...

Last Modified शुक्रवार, 8 एप्रिल 2016 (15:19 IST)
महाराष्ट्रीयन अर्थात मराठी लोकांमध्ये गोडधोडाचा बेत म्हटलं की पुरणाची पोळीचे नाव पहिला येते. ही पोळी चणा डाळीची केली जाते. गुळ घालून पुरण बनविले जाते. काहीजण साखरही घालून पुरण बनवितात. गुळामुळे मात्र पोळीला एक प्रकारचा खमंगपणा येतो. मग ही पुरणाची पोळी बनवायची तरी कशी.. चला पाहूयात..
पुरण साठी साहित्य
२ १/२ कप चाणा डाळ
२ १/२ कप चिरलेला गुळ
१/२ कप साखर
१ टीस्पून जायफळाची पूड

कणकेसाठी लागणारे साहित्य
२ १/२ कप कणिक
१/२ कप
मैदा
१/३ कप तेल (२ टेबल स्पून + १/४ कप + १ टेबल स्पून)

मीठ (कणभर)
पाणी (लागेल तसं कणिक भिजवायला)
तांदुळ पिठी (लागेल तशी पोळ्या लाटायला)
पुरण यंत्र
सापीठाची(बारीक)चाळणी (कणिक चालायला)

पुरणाची कृती
प्रथम चणा डाळ बोटाचा पहिल्या पेरा पर्यंत येईल एवढ्या पाण्यात कूकर मध्ये शिजवुन घ्य. ३-४ शिट्ट्या देऊन गेस बारीक करून थोडा वेळ ठेवा. शिट्टी पडल्यावर डाळ काढून चाळणीवर निथळत ठेवा. निथळलेले पाणी(ह्यालाच कट म्हणतात) एका डब्यात भरून ठेवा, हे पाणी आपण कटाच्या आमटी करता वापरणार आहोत.
आता डाळीत चिरलेला गुळ आणि साखर घाला. हे सर्व मिश्रण एका मायक्रोवेव्ह चा भांड्यात घाला.

मायक्रोवेव्हमध्ये पुरण शिजवुन घ्या. साधारण १५ ते १७ मिनिटे लागतात. ४ मिनिटे आधी ठेवा आणि मग लागेल तशी मिनिटे ठेवा. दर ४-५ मिनिटांनी पुरण चमच्याने हलवुन घ्या. पुरणात चमचा व्यवस्तीत उभा राहिला की पुरण झाले असे समजावे.

पुरण तयार झाल्यावर त्याच्यात जायफळाची पुड घाला आणि एकत्र कर. नंतर हे पुरण, पुरण यंत्रातुन काढुन घ्यावे. पुरण यंत्रात शेवटचे राहिलेले पुरण काढून कटा बरोबर एकत्र करून बाजुला ठेवुन द्या. हे तयार झाले तुमचे पुरण.

कणकेची कृती
चाळणीने कणिक चाळून घ्यावी. चाळणी वर राहिलेला कोंडा टाकुन द्यावा. त्याच चाळणीत मैदा देखील चाळून घ्यावा. नंतर कणकेत मीठ घाला आणि २ टेबल स्पून तेल घाला, थोडं थोडं
पाणी घालुन
कणिक अगदी सैलसर भिजवावी. आता १/४ कप तेल घालुन कणिक चांगली मलवि. कणिक एकदम सैल असली पहिजे. कणिक माळून साल्यावर बोटाने कणकेवर खळगे बनवा आणि त्याचात साधारण १ ते २ टेबल स्पून ओता. झाकण ठेवुन कणिक १ तास बाजुला ठेवुन घ्या.
पोळ्या लाटायला कणकेची पुरी पेक्षा थोडी जास्ती गोळी घ्या आणि त्या गोळीच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्या.

ह्या गोळीत पुरण भरा आणि एक मोठा गोळा तयार करा. हातानी दाबून हा गोळा चपटा करा व तांदुळाच्या पिठीत घोळून घ्या. आता पोळपाटावर तांदुळ पिठी भुरभुरून टाका. अगदी सैल हातानी कणकेचा पुरण भरलेला गोळा घेऊन अलगद लाटा. लाटताना मध्ये मध्ये पोळपाट हलवावा म्हणजे पोळी चिकटत नाही. आता लाटण्यावर अलगद गुंडाळुन पोळी गरम तव्यावर टाका आणि दोन्ही बाजूने छान भाजुन घ्या.
हीच कृती उरलेल्या पोळ्या करायला वापरा . ह्या मापाचा साधारण १७ मोठ्या आकाराच्या पोळ्या होतात. पोळी गार झाल्यावर भरपुर तुप घालुन खावी. खास बटाटा भाजी आणि कटाची आमटी असेल तर पुरणाच्या पोळीची मजा काही औरच.


यावर अधिक वाचा :

फेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत

national news
फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...

फेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार

national news
आता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...

संकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...

national news
संकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...

स्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा

national news
अमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...

चिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी

national news
अल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...