लागणारे जिन्नस: 250 ग्रॅम मैदा, 1/4 चमचा सोडा, मोहनासाठी तेल, 1 वाटी मक्याचा कीस, 1/2 वाटी ड्राय फ्रूटचे काप, दोन चमचे खसखस, 1/2 वाटी नारळाचा कीस, 1/2 वाटी साखर, तळण्यासाठी तेल किंवा शुद्ध तूप. करावयाची कृती: मैदा गाळून त्यात सोडा आणि मोहन टाकून घ्या. कढईत तूप गरम करून त्यात मक्याचा कीस भाजून घ्या. हलक्या सोनेरी रंग झाल्यावर त्यात सर्व ड्रायफ्रूट, खसखस तुपात भाजून घ्या. नारळाचा कीस आणि साखर टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्याचे लहान-लहान गोळे बनवून घ्या. मैद्याचे गोळे बनवून त्यात ड्रायफ्रूटचे तयार केलेले गोळे भरून व्यवस्थित हाताने दाबा. कढईत तेल गरम करून कचोरी सोनेरी रंग येईपर्यंत तळा. आणि गरमागरम कचोरी ताज्या दह्यासोबत सर्व्ह करा.