1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

संत्र्याचा मुरंबा

साहित्य : एक डझन तयार संत्री, दीड किलो साखर, संत्र्यांच्या साली, लिंबू

ND
कृती : संत्र्यांची साल काढून टाकावी. आतील फोडींवर पातळ पापुद्रा असतो. तो ही काढून टाकावा व बियाही काढून टाकाव्यात. नंतर संत्र्यांच्या फोडी व साखर व संत्र्यांच्या सालीचे थोडे लहान तुकडे स्टेनलेस्‌ स्टीलच्या भांड्यात एकत्र करून, वर झाकण घालून, भांडे तसेच सात-आठ तास ठेवावे. नंतर ते भांडे विस्तवावर ठेवावे. थोडासा लिंबाचा रस घालावा व शिजवावे. मधाइतपत पाक घट्ट होईपर्यंत शिजवावे. नंतर गार झाल्यावर मुरंबा बरणीत भरावा.